नवी दिल्ली | New Delhi
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने दोन आठवड्यात अजित पवार गटाला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ६ ऑगस्टला होणार आहे.निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिलेल्या निकालात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.त्यावर आज ही सुनावणी झाली.
हे देखील वाचा : “नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज” – आ. खोसकरांचा दावा
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, “या प्रकरणात अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) दोन आठवड्यात उत्तर सादर करावे. तसेच अजित पवारांच्या उत्तरावर जर शरद पवार यांना प्रतिवाद सादर करायचे असल्यास एक आठवड्यात शरद पवारांनी (Sharad Pawar) ते दाखल करावे, असेही न्यायालयाने म्हटले. तसेच २ आठवड्यात अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाला उत्तर द्यावं आणि त्यानंतर एक आठवड्यात आम्ही उत्तर देऊ”, असेही न्यायालयाने सांगितले.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवार थेट मोदीबागेत; थोरल्या पवारांची भेट की आणखी काही?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या वादावरील पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होईल असेही न्यायालयाने म्हटले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आमची अपेक्षा आहे की पुढील ४ ते ५ सुनावण्यात निकाल लागेल, असे महत्वाचे विधान केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा