Wednesday, February 11, 2026
HomeराजकीयRevati Sule : माझ्या लेकीचं लग्न ठरलं! सुप्रिया सुळेंनी दिली गुड न्यूज;...

Revati Sule : माझ्या लेकीचं लग्न ठरलं! सुप्रिया सुळेंनी दिली गुड न्यूज; भावी जावयाचे फोटोही केले शेअर

मुंबई । Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सदानंद सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी अधिकृतपणे जाहीर केली आहे. रेवती सुळे यांची लग्नगाठ नागपूरचे प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्याशी बांधली जाणार असून, या निमित्ताने पवार आणि सुळे कुटुंबात सनईचौघड्यांचे सूर घुमणार आहेत.

- Advertisement -


सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर याबद्दलची पोस्ट शेअर करताना आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, “आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, आमची कन्या रेवती सुळे ही वंदना आणि अरुण लखानी यांचा मुलगा सारंग याच्याशी विवाह करणार आहे.” हे लग्न ‘अरेंज मॅरेज’ पद्धतीने ठरले असल्याचे समजते. या घोषणेसोबत सुप्रिया सुळेंनी काही निवडक फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये रेवती आणि सारंग यांच्यासोबतच सदानंद सुळे आणि त्यांचे होणारे जावई सारंग लखानी हे टेनिस कोर्टवर एकत्र दिसत आहेत. या फोटोंमधून सासरे आणि जावई यांच्यातील उत्तम बाँडिंग समोर आले आहे.

YouTube video player


रेवती सुळे यांच्या विवाहाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली होती. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सर्वात आधी सोशल मीडिया पोस्टद्वारे या लग्नाचे संकेत दिले होते. शिंदे आणि पवार कुटुंबातील घनिष्ठ संबंध पाहता, या बातमीवर सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर सुप्रिया सुळे यांनी स्वतः यावर मोहोर उमटवली आहे. हे लग्न ठरवण्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून, त्यामुळे नागपूर आणि बारामतीमध्ये आता जिव्हाळ्याचे नाते निर्माण होणार आहे.


रेवती सुळे यांनी आपले प्राथमिक शिक्षण मुंबईतून पूर्ण केल्यानंतर, लंडनमधील प्रतिष्ठित ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून उच्चशिक्षण घेतले आहे. त्या प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय नसल्या तरी, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात त्यांनी आपल्या आईच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. तर दुसरीकडे, सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी हे नागपुरातील ‘विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’चे अध्यक्ष म्हणून ओळखले जातात.


कुटुंबात आनंदाचे वातावरण असले तरी, पवार आणि सुळे कुटुंबासाठी हा काळ भावूकही आहे. सुप्रिया सुळे यांचे चुलत बंधू अजित पवार यांच्या निधनाला अद्याप दोन आठवडेच उलटले आहेत. त्यामुळे या विवाह सोहळ्याच्या मुहूर्ताबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. या लग्नात रेवती आपल्या लाडक्या मामाला आणि सुप्रिया सुळे आपल्या ‘दादां’ना नक्कीच आठवतील, अशी भावना व्यक्त केली जात आहे. लवकरच या शाही विवाह सोहळ्याची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

राहुल

Rahul Gandhi: तुम्हाला भारत विकण्याची लाज वाटत नाही का? तुम्ही आमची...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiलोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सभागृहात भाषण केलं. सभागृहात बोलताना राहुल गांधी यांनी अमेरिकेवर निशाणा साधलाच पण...