Friday, May 3, 2024
Homeनाशिकपुरात नुकसान टाळण्यासाठी नाल्यांचे सर्वेक्षण करा: भुजबळ

पुरात नुकसान टाळण्यासाठी नाल्यांचे सर्वेक्षण करा: भुजबळ

महादेवनगर । वार्ताहर | Mahadevnagar

देवगाव, वाकद शिरवाडे, रुई, कोळगाव, कानळद, खेडलेझुंगे या परिसरात पावसाच्या पाण्यामुळे (rain water) शेतकर्‍यांच्या (farmers) पिकांची दरवर्षी नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना प्राधान्य देवून होणारे नुकसान टाळण्यासाठी परिसरातील चर, नाल्यांचे तत्काळ सर्वेक्षण (Survey) करावे. कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावा.

- Advertisement -

त्यास शासनस्तरावर मंजूर करण्यासाठी सर्वतोपरीने मदत करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector’s Office) आयोजित पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) बैठकीत पालकमंत्री ना.भुजबळ यांनी आदेश दिले.

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan d.), जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ.संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, नाशिक पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सागर शिंदे, नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संगिता जगताप, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, माजी जि.प. सदस्य हरिश्चंद्र भवर, माजी पं.स. सदस्य भाऊसाहेब बोचरे, माजी सरपंच विनोद जोशी, शिवाजी सुपनर, पांडूरंग राऊत, जयवंत लोहारकर, सरपंच शांताराम जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी यांनी पावसाच्या पाण्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान तसेच पाण्याचा निचरा (Drainage) होण्यासाठी परिसरातील भौगोलिक परिस्थितीची माहिती बैठकीत दिली. यावेळी बोलतांना पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, देवगाव, रुई, खेडलेझुंगे, कोळगाव, कानळद, वाकद, शिरवाडे परिसरात वरील 9 ते 10 गावांचे पाणी येत असल्यामुळे ते पाणी गोदावरी नदीत (godavari river) निघून जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे दरवर्षी नुकसान आहे.

सदरचे नुकसान टाळण्यासाठी देवगाव, रुई, कोळगाव, कानळद, गोदावरी कालवा 15 नंबर व नाला 7 नंबर मोर्‍यापर्यंत खोदकाम करून चर काढण्याच्या कामाच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळणेबाबत या कामांचा प्रस्ताव तयार करून तो तत्काळ सादर करण्यात यावा असेही आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिले आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या चर चा प्रश्न मार्गी लागणार असल्याने परिसरातील गावच्या शेतकर्‍यांनी नामदार भुजबळ यांचे आभार मानले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या