Friday, November 22, 2024
Homeराजकीयविधानपरिषद निवडणुकीत कोणाचा गेम होणार?; सुषमा अंधारेंच्या 'त्या' ट्विटची जोरदार चर्चा

विधानपरिषद निवडणुकीत कोणाचा गेम होणार?; सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ ट्विटची जोरदार चर्चा

मुंबई । Mumbai

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी तब्बल १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या सर्व उमेदवारांसाठी आज (१२ जुलै) मतदान होत असून सर्वांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. मतदानाला सकाळी ९ वाजल्यापासून सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने ९ उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे पराभूत होणारा कोण असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषद निवडणुकीत पराभूत होणाऱ्या उमेदावाराबाबत सूचक विधान केलं आहे.

” ‘गर्जे’ल तो पडेल काय? #खेला_होबे” असं सूचक ट्वीट ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊण्टवर केलं आहे. अजित दादांकडून शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अंधारेंनी ‘गर्जे’ल असा शब्द वापरत त्यात गर्जे या शब्दाला कोट केल्यामुळे त्यांचा रोख शिवाजीराव गर्जे यांच्याकडेच दिसत आहे.

हे देखील वाचा :  धक्कादायक! भूस्खलनामुळे दोन बस नदीत कोसळल्या, ६३ प्रवासी बेपत्ता

विधान परिषद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी प्रत्येकी २३ मतांचा कोटा निश्चित झालेला आहे. राष्ट्रवादीकडे स्वतःची ४० मतं असून त्यांना दोन उमेदवार विजयी करण्यासाठी आणखी सहा अतिरिक्त मतांची गरज आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या