Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजगावठी कट्टा विक्री करणारे संशयित अटकेत

गावठी कट्टा विक्री करणारे संशयित अटकेत

नाशिकरोड | प्रतिनिधी

- Advertisement -

चेहडी पंपिंग परिसरात दोन युवक गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेले असता त्यांना नाशिकरोड गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्‍यांनी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त केली आहे.

YouTube video player

पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांना गुप्त माहिती मिळाली की, चेहडी पंपिंग, हनुमान मंदिराजवळ दोन संशयित युवक गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमकर. विशाल कुंवर, नाना पानसरे, समाधान वाजे, अजय देशमुख आदींनी सापळा रचला.

यावेळी दोन संशयित उभे होते. पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जात असतांना त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफिने त्यांना ताब्यात घेतले. त्यांचे नाव व पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव खुशाल गजानन बोरसे (वय ३० वर्षे, रा. गजानन पार्क समोर, बनकरमळा, नाशिकरोड) विकी गोरख पाटील (वय २५ वर्षे रा. आदर्श विद्या मंदिर, वालदेवीनगर, गाडेकर मळा, नाशिकरोड) असे सांगून त्यांच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल (कटटा) मॅग्झीन सह व दोन जिवंत काडतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...