Thursday, May 2, 2024
Homeधुळे‘तो’ शासन निर्णय स्थगित करा

‘तो’ शासन निर्णय स्थगित करा

धुळे Dhule । प्रतिनिधी

आपले गुरुजी(Under your Guruji campaign) या नावाने संबंधित शिक्षकांचा फोटो (Teacher’s photo) वर्गामध्ये (Class) प्रदर्शित करणे बाबतचा शासननिर्णय तात्काळ स्थगित (Adjournment of the ruling immediately) करा. अशी मागणी शिक्षक भारती संघटनेतर्फे (Teacher Bharati Association) करण्यात आली असून यासाठी मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे

- Advertisement -

कामचुकार शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी आमचे गुरुजी मोहिम राबविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. या मोहिमेंतर्गत शिक्षकांचे वर्गात फोटो लावण्याचे प्रस्तावित केले आहे. शिक्षकांना मी खरा शिक्षक आहे असे फोटो -लावण्याचा शासनाचा हा निर्णय हास्यास्पद आणि अपमानकारक आहे.

सगळेच शिक्षक काही कामचुकार नाहीत. 90 टक्के शिक्षक प्रामाणिकपणाने ज्ञानदानाचे काम करत आहेत. दोन ते तीन टक्के शिक्षक कामचुकारपणा करतात. त्यांच्यावर शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत कार्यवाही करावी. मात्र सरसकट सगळयाच शिक्षकांना एकाच नजरेने पाहणे चुकीचे आहे. जसे एस.टी स्टँडवर चोरांचे फोटो लावले जातात तसे वर्गात सरांचे फोटो लावायचे का शिक्षकांना तुम्ही त्या रांगेत बसवणार का?

वास्तविक सरकारने, शिक्षकांना विश्वास दिला पाहिजे. मात्र सरकारची धोरणे शिक्षकांचे खच्चीकरण करणारे आहे. राज्यात हजारोंच्या संख्येने शिक्षक संख्या रिक्त आहेत. विनाअनुदानित शिक्षका 15 वर्षांपासून वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत. खासदार, आमदार पेंशन घेत असतांना शिक्षकांसह सर्व कर्मचारी जुनी पेंशनसाठी लढत आहेत. विनाअनुदानित शिक्षकांना सेवा सरंक्षण नाही.

शिक्षण विभागातील अशा अनेक मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी सरकारकडून शिक्षकांविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे.शासनाने तात्काळ हा तुघलकी निर्णयास स्थगिती द्यावी, असे निवेदन शिक्षक भारती विनाअनुदान विरोधी संघर्ष समिती राज्याध्यक्ष जयवंत भाबड, राहुल पाटील, अशपाक खाटीक, नाना पाटील, रुपाली कुरूमकर, जनार्धन गायकवाड, ज्योती सोनवणे, भाग्यश्री जाधव, आबासाहेब पाटील, विनोद रोकडे, किरण मासुले, जयवंत पाटील, रावसाहेब चव्हाण, सुधाकर पाटील, खेमचंद पाकले, कैलास अमृतकर, नानाभाऊ महाले, शैलेश धात्रक, अमीन कुरेशी, मुश्ताक शेख यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या