Friday, May 3, 2024
Homeनगरनिलंबीत पोलीस निरीक्षक वाघची अटक अटळ

निलंबीत पोलीस निरीक्षक वाघची अटक अटळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अत्याचाराच्या गुन्ह्यात फरार असलेला निलंबीत पोलीस निरीक्षक विकास वाघ याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने आज फेटाळला आहे. त्यामुळे वाघ याच्या अटकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

- Advertisement -

कोतवाली पोलीस ठाण्यात इनचार्ज असताना 25 वर्षीय पिडित तरुणीवर अत्याचार करत तिला धमकी देत मारहाण केली तसेच सरकारी बंगल्यावर गर्भपात केल्याचा गुन्हा 29 सप्टेंबर 2020 रोजी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर वाघ पसार झाला. दरम्यान त्याला निलंबीत करण्यात आले. पसार वाघ याने जिल्हा कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

सरकारी वकिल अर्जुन पवार यांनी सरकारच्यावतीने बाजू मांडत भक्कम पुरावे असून गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्वर, पट्टा, बिअरची बाटली, अंगावरील कपडे, मोबाईल, गाडी जप्त करणे बाकी असल्याचे सांगत अटकपूर्व जामिनास हरकत घेतली. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत जिल्हा न्यायाधीश एम.व्ही.देशपांडे यांनी वाघ याचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

307 वाढीव कलम

गुन्ह्यात सुरूवातीला 376(2)(ए),313,323,504,506 प्रमाणे कलमे लावण्यात आली होती. तपासांती या गुन्ह्यात 307 हे वाढीव कलम लावण्यात आले. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास डीवायएसपीकडे देण्यात आल्याचे सरकारी वकिल पवार यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या