Thursday, May 2, 2024
Homeधुळेबालिकेचा संशयास्पद मृत्यू

बालिकेचा संशयास्पद मृत्यू

धुळे | दि.१८ | प्रतिनिधी Dhule

तालुक्यातील निमगुळ येथील दोन वर्षीय बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली.

- Advertisement -

या बालिकेचे रात्री घरातून अपहरण करण्यात आले. सकाळी शोध घेतला असता गावाबाहेरील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. दरम्यान बालिकेच्या मृत्युचे नेमणे कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर समोर येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिली.

प्राची प्रविण महाजन (निमगुळ ता. धुळे) से मयत बालिकेचे नाव आहे. काल दि. १७ जी रात्री ती घरात कुटुबियांसह झोपलेली असतांना तिला राहत्या घरातून दरवाजा उघडून उचलून घेवून गेले.

पहाटे कुटुंबियांना जाग आली असता प्राची घरात कोठेही आढळून आली नाही. त्यामुळे कुटूंबियांनी तिचा ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरू केला. मात्र गावात कोठेही ती मिळून आली नाही. त्यामुळे तालुका पोलिसांना कळविण्यात आले.

माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह पथक गावात दाखल झाले. त्यांनी प्राचीचा शोध सुरू केला. त्यादरम्यान गावापासून अडीच ते तीन कि.मी अंतसरावर असलेल्या एका शेतातील विहिरीत तिचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला.

तिला बाहेर काढण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. दरम्यान बालिकेचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारण मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.

अपहरणाचा गुन्हा

प्राचीचे रात्रीच्या वेळी कोणीतरी अपहरण केले. याप्रकरणी तालुका पोलिसात अज्ञात इसमाविरूध्द भांदवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान बालिकेच्या घातपाताचा संशय असून पोलिस कसून तपास करीत आहेत.

कुटुंबियांचा आक्रोश

सकाळी विहिरीत बालिकेचा मृतदेह आढळून आल्याने तिच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. यावेळी बालिकेच्या घरी गावातील महिलांनी गर्दी केली होती. यावेळी अनेकांना अश्रु अनावर झाले होते. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या