Thursday, May 2, 2024
Homeनगरस्वामी सागरानंद सरस्वती ब्रम्हलीन यांच्या आठवणीने लोणीकर गहिवरले

स्वामी सागरानंद सरस्वती ब्रम्हलीन यांच्या आठवणीने लोणीकर गहिवरले

लोणी |वार्ताहर| Loni

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष व तपोनिधी श्री पंचायती आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत 108 स्वामी सागरानंदजी सरस्वती महाराज शनिवार दि. 8 ऑक्टोबर रोजी ब्रम्हलीन झाले. ते 101 वर्षांचे होते.

- Advertisement -

मार्च 2020 मध्ये राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार देऊन त्यांचा बिजोत्सव सोहळ्यात सन्मान करण्यात आला होता. यावेळी त्यानी संत तुकाराम महाराज यांच्यासारखा विश्वविख्यात संत पुन्हा होणार नाही. तुकाराम गाथा हा पाचवा वेद त्यांनी निर्माण केला. संत तुकाराम महाराजांची सेवा करणारे भाग्यवान आहेत.

तुकाराम बीज निमित्ताने मिळालेला संत सेवा पुरस्कार म्हणजे साक्षात तुकोबारायांचा प्रसादच आहे, असे ते म्हणाले होते. लोणीच्या भूमीत या महान संत सेवकांचा सन्मान करण्याचा योग आम्हाला आला. याचा आनंद, समाधान आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही, अशी भावना महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केली होती. स्वामीजींच्या आठवणीने अवघे लोणीकर गहिवरून गेले. लोणीभूषण भारत महाराज धावणे म्हणाले, स्वामीजींच्या जाण्याने वारकरी संप्रदायाचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्यासारख्या तरुण किर्तनकारांचे ते प्रेरणास्थान होते व पुढेही राहतील. त्यांचा त्र्यंबकेश्वर व लोणी येथे काही वेळ सहवास लाभला, यामुळे आम्ही भाग्यवान समजतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या