Friday, May 17, 2024
Homeक्रीडादोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज T20 World Cup मधून बाहेर

दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज T20 World Cup मधून बाहेर

दिल्ली | Delhi

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी २० विश्वचषकात शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) पहिल्या फेरीत गट बमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध आर्यलंड यांच्यात सामना खेळला गेला.

- Advertisement -

बेलेरिव ओवल, होबार्ट येथे खेळला गेलेला हा सामना जो जिंकेल तो संघ सुपर १२ मध्ये पोहोचणार होता. यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा होता. यामध्ये आयर्लंडने बाजी मारली आहे. त्यांनी वेस्ट इंंडिजला तब्बल ९ विकेट्सने पराभूत करत टी २० विश्वचषकाच्या सुपर १२ मध्ये धमाक्यात एंट्री केली आहे.

वेस्ट इंंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांची पॉवर प्लेमध्येच अवस्था २ बाद २७ धावा अशी झाली होती. त्यानंतर लुईस आणि ब्रँडन किंगने डाव सावरत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी ग्रेथ डॅनले लुईसला १३ धावांवर बाद करत फोडली. कर्णधार निकोलस पूरन देखील १३ धावांची भर घालून परता. अखेर अर्धशतकी खेळी करणाऱ्या ब्रँडन किंगने विंडीजला शतकी मजल मारून दिली.

मात्र रोव्हमन पॉवल ६ धावा करून बाद झाल्याने विंडीजला स्लॉग ओव्हरमध्ये आपली धावसंख्या वाढवण्यात अपयश आले. ओडेन स्मिथने १२ चेंडूत १९ धावा करत विंडीजला १४६ धावांपर्यंत पोहचवले. ब्रँडन किंगने ४८ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी केली. आयर्लंडकडून ग्रेथ डॅनलेने प्रभावी मारा करत ४ षटकात १६ धावा देत ३ फलंदाज टिपले. सिमी सिंग आणि बॅरीने प्रत्येकी १ विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या आर्यलंडने ४.२ षटकातच ५० धावा केल्या. त्यांचा कर्णधार-सलामीवीर अँड्रयू बालबर्नी आणि पॉल स्टर्लिंग यांनी पहिल्या गड्यासाठी ४५ चेंडूत ७३ धावांची भागीदारी रचली. बालबर्नीने २३ चेंडूत ३७ धावा केल्या. तसेच स्टर्लिंगने ३२ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने शेवटपर्यंत फलंदाजी करत ४८ चेंडूत ६६ धावा केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या