Sunday, April 20, 2025
Homeक्राईमCrime News : टाकळीभान येथे टोळीयुध्दाचा भडका

Crime News : टाकळीभान येथे टोळीयुध्दाचा भडका

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

गेल्या काही दिवसांपासून गौणखनिज उत्खनणावरुन खदखदत असलेल्या टोळीयुध्दाचा टाकळीभान येथे अखेर भडका उडाला. या हाणामारीत एक जण जखमी झाला असून याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. जखमीवर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

टाकळीभान येथे गेल्या काही दिवसांपासून गौणखनिज उत्खनन जोमात सुरु आहे. या धंद्यात दोन तीन टोळ्या कार्यरत असल्याने व्यवसायीक स्पर्धेतून अधून-मधून धुसफुस सुरु असते. मात्र, काल या टोळीयुध्दाचा भडका सार्वजनिक ठिकाणी उडाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या हाणामारीत तुषार पवार हा तरुण जखमी झाला असून त्याच्या वाहनाची हल्लेखोरांनी तोडफोड केली आहे.

याबाबत तुषार बाळासाहेब पवार (वय 26) धंदा शेती, रा. पाचेगाव ता.नेवासा यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादित म्हटले आहे की, लाला उर्फ विजय किशोर मैड, मनोज यशवंत पवार, विठ्ठल पुंजाहारी जाधव, संकेत सर्जेराव गायकवाड सर्व रा. टाकळीभान, ता.श्रीरामपूर यांनी फिर्यादी हे टाकळीभान येथील अक्षय बनकर येथील भेळीचे दुकानावर भेळ घेण्यास गेले असता तेथे आरोपी त्यांना म्हणाले की तू बाहेर गावातून येवून येथे मुरुम व्यवसाय करतो काय? तुझ्याकडे पहातो असे म्हणून आरोपी लाला उर्फ विजय किशोर मैड याने हातातील गावठी कट्ट्यासारखे हत्याराने, आरोपी मनोज यशवंत पवार याने तलवारीने मारले, आरोपी विठ्ठल पुंजाहारी जाधव याने हातातील लोखंडी रॉडने तर आरोपी संकेत सर्जेराव गायकवाड याने त्याच्या हातातील धारदार कत्तीने मारहाण केली. आरोपी इतर दोन ते तीन अनोळखी इसमांनी शिवीगाळ करुन त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करुन फिर्यादीच्या स्विप्ट कारच्या काचा फोडून नुकसान केले.

या प्रकरणी आरोपीं विरोधात भारतीय न्याय संहिता कायदा कलम 109, 189(2), 189(4), 191(3), 190, 351(2) (3), 35 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे लोणी प्रवरा हॉस्पिटल येथे औषधोपचार घेत असून त्यांनी दिलेल्या जबाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. डौले करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अवैध धंद्यांंविरोधात मोहिम सुरू करा – पालकमंत्री विखे पाटील

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध...