Tuesday, January 6, 2026
HomeनगरBribe News : तलाठ्यास 25 हजारांची लाच घेताना पकडले

Bribe News : तलाठ्यास 25 हजारांची लाच घेताना पकडले

अहिल्यानगरच्या लाचलुचपत पथकाची धडक कारवाई

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तहसीलदारांनी घरकुलासाठी अधिकृतरित्या वाळू वाहतूक करण्यासाठी परवानगी दिल्यानंतरही कनोलीचे कामगार तलाठी याने कारवाईची भीती दाखवून वाहनधारकाकडे तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अहिल्यानगरच्या लाचलुचपत पथकाने सोमवारी (दि.7) तलाठ्यास संगमनेरात रंगेहात पकडले. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

- Advertisement -

याबाबत मिळालेली माहिती अशी, की कनोली गावात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार मोफत पाच ब्रास वाळू वाटप सुरू करण्यास संगमनेरच्या तहसीलदारांनी मंजुरी दिलेली आहे. सदर वाळू वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर वाळू वाहतुकीसाठी पाच ट्रॅक्टर वाहनांना व वाळू उपसा करण्यासाठी एक जेसीबी व एक फरांडी ट्रॅक्टरला मंजुरी मिळाली आहे. तहसीलदारांनी घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाहतूक करण्यासाठी मंजुरी दिलेल्या ट्रॅक्टरमध्ये तक्रारदार यांच्या मालकीचा एक ट्रॅक्टर आहे.

YouTube video player

तक्रारदार व त्यांचे मित्र हे त्यांच्या ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करण्याचे कामकाज करत असताना कामगार तलाठी संतोष शेलार, तलाठी कनोली यांनी तक्रारदार व त्यांचे मित्र तसेच इतर वाळू वाहतूक करणार्‍या वाहनधारकांना तुम्हाला वाळू वाहतूक करायची असेल तर मला तीस हजार रुपये द्यावे लागतील. अन्यथा तुमच्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असल्याबाबत कारवाई करेल, सदरची कारवाई टाळायची असेल तर तीस हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली.

त्यावर तडजोडीअंती 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी शेलार यास अहिल्यानगर लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, चालक पोलीस हवालदार हारून शेख यांनी संगमनेरात रंगेहात पकडले. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...