Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबारतळोदा येथे रंगला भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये क्रिकेट सामना

तळोदा येथे रंगला भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये क्रिकेट सामना

तळोदा | ता.प्र.- TALODA

येथे सुरु असलेल्या (Cricket tournament) क्रिकेट स्पर्धेत राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) संघावर (taloda) तळोदा पालिकेच्या सत्तेत असलेल्या (bjp) भाजपाच्या संघाने १० गडी राखून विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीच्या संघाने ३ गडी गमावत ५८ धावा केल्या. राजकारणातील विरोधी गट प्रत्यक्ष क्रिकेट ग्राऊंडवर एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने बघ्यांची मोठया प्रमाणावर यावेळी गर्दी होती.

- Advertisement -

Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

येथील भारत ऑईल मिलच्या मैदानावर शहरातील क्रिकेट प्रेमींनी दिवसरात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत १२९ संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघाला आठ षटक खेळायला दिले जातात.

स्पर्धेतील अंतिम विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक आ.राजेश पाडवी यांच्याकडून ५१ हजार रूपये, द्वितीय पारितोषिक युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र लक्ष्मण माळी यांच्यातर्फे ३१ हजार रूपये, तिसरे पारितोषिक नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्यातर्फे २१ हजार रुपये जाहीर करण्यात आले आहे.

मैदानावर विद्यूत रोषणाईची व्यवस्था भाजपचे शहराध्यक्ष योगेश चौधरी यांच्याकडून करण्यात आली आहे. या स्पर्धेत दररोज चार संघात स्पर्धा खेळण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दि.१४ डिसेंबर रोजी येथील भारतीय जनता पक्ष व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या पदाधिकार्‍यांत क्रिकेट सामना खेळला गेला. भाजपच्या संघात नगराध्यक्ष तथा कर्णधार अजय परदेशी, शहराध्यक्ष योगेश चौधरी, भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष शिरिषकुमार माळी, नगरसेवक रामानंद ठाकरे, नगरसेवक योगेश पाडवी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष जगदीश परदेशी, स्विकृत नगरसेवक हेमलाल मगरे, राजू पाडवी, मतीन खान, गोकुळ मिस्त्री, अरविंद प्रधान, दिपक चौधरी होते.

महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र माळी, न.प.गटनेते गौरव वाणी, कर्णधार सुभाष चौधरी, युवा शहर उपाध्यक्ष गोविंद पाडवी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश मराठे, संदीप परदेशी, राहुल पाडवी, शिवसेनेचे शहरप्रमुख जितेंद्र दुबे, आनंद सोनार, अनूप उदासी, प्रफुल्ल कूलकर्णी आदी स्पर्धेत सहभागी झाले होते. महाविकास आघाडीच्या संघाने प्रथम फलंदाजी करत ३ गडी गमावत ५८ केल्या. भाजपाने संघाने एकही गडी न गमावता ५९ धावा काढून एकतर्फी विजय मिळविला.

क्रिकेटचा सामना राजकीय पदाधिकार्‍यांत असल्याने उत्सुकता, रग, जोम दिसून आल्याने लढत चूरशीची झाली. जे नगरसेवक, पक्ष पदाधिकारी राजकारणाच्या मैदानात एकमेकांसमोर निवडणूक लढले आहेत, भविष्यातही एकमेकांसमोर लढतील, त्यांच्यात ही खिलाडूवृत्तीची लढत असल्याने बघ्यांची अफाट गर्दी जमली होती.

या निकालावरुन डिसेंबर २०२२ मध्ये होणार्‍या नगरपालिका निवडणुकीचे भाकितही वर्तविले जात आहे. क्रिकेट स्पर्धेत जेवढे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. ते सर्वच आपापल्या पक्षात उमेदवारी करण्यासाठी इच्छूक आहेत. या सर्वांची पून्हा निवडणूकीच्या मैदानात सामना रंगणार असल्याची चर्चा रंगली होती.

आज ज्या पक्षातून क्रिकेट खेळत आहेत त्यातून काही पक्ष बदलून निवडणूकीत दिसतील यावर काहींनी पैजा लावल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या