दिल्ली | Delhi
करोनाच्या (corona update) डेल्टा (delta) आणि ओमिक्रॉन (omicron) व्हेरियंटमुळे देशात तिसऱ्या लाटेचा (corona third wave) उद्रेक झाला असून, दररोज लाखो नागरिक कोविड पॉझिटिव्ह आढळून येत आहे. देशात तिसरी लाट (Third Wave) आली असून, केंद्र सरकारसह राज्ये निर्बंध घालू लागली आहेत.
- Advertisement -
दरम्यान वाढत्या करोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू सरकारने (Tamilnadu) संपूर्ण लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली आहे. तिसऱ्या लाटेत लॉकडाऊनची घोषणा करणारे तामिळनाडू हे पहिले राज्य ठरले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी येत्या २३ जानेवारीपासून संपूर्ण राज्यात संपूर्ण लॉकडाऊन असल्याची घोषणा केली आहे.