मनोहर कांडेकर
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-
तालुक्यतील खरजई ग्रामपंचायतला पाणलोट विभागतर्फे शेतीला व पाणी पुरवठ्यासाठी मिळलेले पाण्याचे टँकर गेल्या पाच वर्षांपासून चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे. परंतू गेल्या पाच वर्षात यासंंबंधीत साधी तक्रारी सुद्धा ग्रामसेवकाकडून पोलिसात दाखल करण्यात आली. या गंभीर प्रकाराकडे त्वरित वरिष्ठानी लक्ष घालून टँकर चोरीबाबत गुन्हां दाखल करुन, दोषीवर देखील कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शहरालगत असलेल्या खरजई गावाची लोकसंख्या अडीच हजार आहे. या गावाल पाणी पुरवठा करण्यासाठी पाणलोट विभागातर्फे साधरणता; २०१३-०१४ मध्ये टँकर मिळाले होते. परंतू गेल्या पाच ते सहा वर्षापासून हे टँकर ग्रामपंचायतीकडे नसून ते कोणीतरी अज्ञात व्यक्त घेवून गेले आहे. हे टँकर चोरी झाल्याची तक्रार अद्यापपर्यंत गेल्या चार वर्षांपासून खरजई ग्रामपंचातमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेल्या श्री.बिर्हाडे यांनी दिली नाही. तसेच मागील व विद्यामान सरपंचानी सुध्दा याबाबत तक्रार केली नाही. नेमके टँकर चोरीचे पाणी कुठे मुरते आहे, याचा खुलासा होत नसून सर्व जन हातावर हात धरुन बसलेले आहे. शासनातर्फे तब्बल ७० ते ८० हजार रुपये किमतीचे टँकर गावाला मिळाले होते. परंतू ते गेल्या सहा वर्षांपासून गायब झाल्यामुळे ग्रामस्थांना टँकरव्दारे पाण्याची सुविधा मिळत नाही. नेमके याप्रकरणामागे गाय गोेंडबंगाल आहे हे समजत नाही. यासंबंंधीत तक्रार देण्यासाठी ग्रा.पं.सदस्य संदिप पाटील, ज्ञानेश्वर मुलमुले, आण्णा म्हस्के हे तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता टँकर चोरी बाबत गटविकास आधिकार्यांनी लक्ष घालून या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेवून दोषी आधिकार्यांवर कारवाई करुन, त्वरित गुन्हां दाखल करावा.
खरजई ग्रामपंचायतीला मिळालेले टँकर गेल्या सहा वर्षांपासून गायब आहे. परंतू मागील बॉडीने याबाब तक्रार दिली नाही. मला खरजई येथे रुजू होवून चार वर्ष झाली आहेत. त्यामुळे माझा कार्यकाळात हे टँकर चोरी गेले नसल्यामुळे मी तक्रार दिली नाही. मंगळवारी ग्रामपंचायतीची मिटींग आहे. त्यात टँकर चोरीबाबतचा विषय ठेवून पुढील कार्यवाईसाठी प्रयत्न करु.
श्री.बिर्हाडे, ग्रामविकास आधिकारी