Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यकर्त्यांनीच केली कर चुकवेगिरी

राज्यकर्त्यांनीच केली कर चुकवेगिरी

नाशिक | Nashik

देवळा तालुक्यातील (Deola Taluka) मोठ्या ग्रामपंचायतपैकी एक असलेली ग्रामपंचायत म्हणजेच लोहोणेर ग्रामपंचायत (Lohoner Gram Panchayat) होय. या ग्रामपंचायतमध्ये १७ सदस्य असून त्यापैकी तब्बल ११ सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कर भरणा (payment taxes) विहित मुदतीत केला नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे…

- Advertisement -

विशेष म्हणजे ग्रामस्थांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी जनजागृती फेरी काढणाऱ्या सदस्यांनीच कर चुकवेगिरी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच कर चुकवेगिरी करणाऱ्या सदस्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी करणारी याचिका अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्ते समाधान महाजन (Samadhan Mahajan)यांनी सोमवारी (दि.१०) दाखल केली आहे.

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या १४(ह) अन्वये कर भरणा नोटीस पाठविल्यांनतर ९० दिवसांच्या आत कर भरणे आवश्यक आहे. परंतु ग्रामविकास अधिकारी यांनी सदस्यांना कर भरणा करण्याबाबत नोटीस (Notice) बजावून देखील ११ सदस्यांनी ९० दिवसांच्या आत कर भरलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर सदस्य अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे.

दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष विठोबा द्यानद्यान (Vithoba Dyandayan)यांच्या मार्गदर्शनानुसार माहिती अधिकार कार्यकर्ते समाधान महाजन हे या प्रकरणातील दोषींवर योग्य कार्यवाही करण्यासाठी वाचा फोडत आहेत.

आमची लढाई कायदेशीर असून ज्या सदस्यांनी विहित मुदतीत कर भरणा केला नाही त्यांची तक्रार आम्ही योग्य त्या प्राधिकरणाकडे करून न्याय मिळविणार आहोत.

समाधान महाजन

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या १४ (ह) अन्वये ९० दिवसांच्या आत कर भरणा न केल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कार्यवाही होते. सर्व कायदेशीर बाबी पडताळून मगच सदरील प्रकरणाला वाचा फोडली आहे.

विठोबा द्यानद्यान

- Advertisment -

ताज्या बातम्या