Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याआजारी उद्योगांसाठी करमाफी योजना

आजारी उद्योगांसाठी करमाफी योजना

सातपूर । प्रतिनिधी Satpur

बंद पडलेल्या उद्योगांकडील ( Closed Industris ) शासकीय देणी थकित असल्यास त्या थकित रकमेची मुद्दल एकरकमी भरणा केल्यास त्यांना इतर कर आकारणी माफ (Tax exemption )करण्यात येईल. त्या उद्योगाची स्थिर मालमत्ता इतर उद्योगांकडे हस्तांतरीत करण्यास विशेष अभय योजनेद्वारे ( Abhay Yojana )मंजुरी देण्यात आली आहे.

- Advertisement -

पूर्वी बंद पडलेल्या व हस्तांतरित झालेल्या परंतु उत्पादनात न गेलेल्या उद्योग घटकांवर शासनाच्या कोणत्याही विभागाकडून वसुलींची कार्यवाही सुरू असेल तर अशा घटकांनी शासकीय थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरणा केल्यास त्यांना विशेष अभय योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

शासकीय देणी यांकरिता या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या उद्योगास उत्पादन घटक उभारणीसाठी शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळांनी स्वनिधीतून कर्ज दिले आहे. त्या महामंडळांनी थकीत कर्जाच्या परतफेडीची वसुली स्वतः करावी त्याकरिता संबंधित उद्योग घटकाच्या मालमत्तांचे पुनर्गठण करावे. नवीन व्यवस्थापनाने त्याच ठिकाणी तीन वर्षांत उत्पादन सुरू करणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या