Thursday, January 8, 2026
Homeनगरशिक्षक नेत्याचे निलंबन; जिल्हा परिषद प्रशासनाची कारवाई

शिक्षक नेत्याचे निलंबन; जिल्हा परिषद प्रशासनाची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणारे शिक्षक नेते राजेंद्र निमसे यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. निमसे हे नगर तालुक्यातील निंबळक जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक होते. याबाबतचे आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाने काढले असून निलंबनाच्या काळात निमसे यांचे मुख्यालय आता कोपरगाव तालुका करण्यात आले आहे.

- Advertisement -

शिक्षक नेते निमसे यांची नेमणूक असणारी नगर तालुक्यातील निंबळकची शाळा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तपासली होती. यावेळी शिक्षक निमसे हे शाळेत वारंवार गैरहजर असल्यासोबत त्यांच्या अख्यारित येणार्‍या वर्गात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुमार असल्यासोबत संकलित मुल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवता आली. यावरून संबंधीत शिक्षक नेत्याचे आपल्या शाळेकडे आणि वर्गाकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शनिवारी नगर तालुका गटशिक्षण विभागाला पाठवण्यात आले असून निमसे यांना निलंबीत करून निलंबन काळात त्यांचे मुख्यालय हे कोपरगाव करण्यात आले आहे.

YouTube video player

प्रशासनाला केलेला विरोध महागात
जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून घेण्यात येणार्‍या शैक्षणिक निर्णयास विरोध करणे निमसे यांच्या महागात पडले आहे. यामुळे त्यांच्या शाळेची गुणवत्ता तपासून त्यानूसार कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रशासनाच्या चांगल्या बाबींना विरोध करणे निमसे यांना महागात पडल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन; वयाच्या ८३...

0
मुंबई | Mumbai ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ (Madhav Gadgil) यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी पुण्यातील डॉ....