Thursday, May 2, 2024
Homeनगरशिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावा - आ. डॉ. सुधीर तांबे

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावा – आ. डॉ. सुधीर तांबे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

शिक्षण क्षेत्रातील शाळांना अनुदानांसह आयडीचे प्रलंबित प्रस्तावांना मान्यता देणे, कनिष्ठ महाविद्यालयात

- Advertisement -

नियमित वेतन श्रेणीसह शिक्षण सेवकांना मान्यता देणे यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी नाशिक मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.

नाशिक येथील उपसंचालक कार्यालय येथे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात विभागीय शिक्षक सहविचार सभा नाशिक मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत शालार्थ आय.डी.चे प्रलंबित प्रस्तावांना मान्यता देणे, कनिष्ठ महाविद्यालय नियमित वेतनश्रेणी मान्यता व शिक्षण सेवक मान्यता देणे, मुख्याध्यापकांना कायमस्वरूपी मान्यता देणे, डी.सी.पी.एस. योजनेच्या स्लीप स्वाक्षरी करून देणे,

वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले व फरक बिले मंजूर करणे, डी.एड ते बी.एड मान्यता देणे, अनुकंपा तत्वावर मान्यता देणे, वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रसत्व मार्गी लावणे, सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन केस प्रस्ताव ए. जी.ऑफिस ला पाठविणे, सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता व डिसेंबर 2020 पासून प्रलंबित असलेली फरक व वैद्यकीय देयकांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, वाद असलेल्या ठिकाणी मुख्याध्यापकांच्या मान्यतेबाबत, नंदुरबार जिल्ह्यातील 20 टक्के वेतन घेणार्‍या शाळांमधील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखीने देणेबाबत व इतरही प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, सहाय्यक शिक्षण संचालक पुष्पलता पाटील, शिक्षण उपनिरीक्षक किरण कुवर, लेखाधिकारी एस.एस.कदम, शिक्षणाधिकारी (नंदुरबार) कदम, उपशिक्षणाधिकारी देवरे तसेच शिक्षणाधिकारी जळगाव व वेतनपथक अधीक्षक जळगाव हे ऑनलाईन उपस्थित होते.

शिक्षक संघटनेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातून एस.बी.देशमुख, एस.बी.शिरसाठ, गुलाब भामरे, साहेबराव कुटे, प्रदीप सांगळे, के.के.अहिरे, संगीत बाफना, बी.के.सानप, एस.के.शिंदे, विलास सोनार, कारतारसिंग ठाकूर, वीरेंद्र महाले, जळगाव जिल्ह्यातून एस.डी. भिरुड, एन.व्ही.पाटील, अरुण सपकाळे, डिगंबर पाटील, एस.के.पाटील, मनोहर सूर्यवंशी, राजेंद्र शिंदे, धुळे जिल्ह्यातून संजय पवार, देवानंद ठाकूर, पी.बी.सोनवणे, आर.बी.अमृतकर, नंदुरबार जिल्ह्यातून एन.डी.नांद्रे, प्रभाकर नांद्रे, एन.टी.पाटील, गिरीश वसावे, डी.पी.महाले, जे. टी.पवार, संजय पाटील, पुष्पेंद्र रघुवंशी व मुकेश पाटील ऑनलाईन होते. यावेळी ज्युनियर कॉलेज शिक्षक संघटनेचे संजय शिंदे, बी.ए.पाटील, शैलेश राणे, एस.एन.पाटील, अनिल महाजन, डी.पी.पाटील उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या