Wednesday, December 4, 2024
Homeनगरजिल्हातंर्गत बदल्यांपूर्वी शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया

जिल्हातंर्गत बदल्यांपूर्वी शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया

रिक्त जागांची संख्या वाढल्याने गुरूजींना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची चिन्हे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, तसेच पवित्र पोर्टलमधून शिक्षणसेवक नियुक्त्या दिल्यानंतर आता जिल्हा परिषद शिक्षण विभागात पदोन्नतीची प्रक्रिया राबवण्याच्या तयारीत आहे. ही पदोन्नती शिक्षकांच्या बदल्यापूर्वी झाल्यास पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती मिळणार आहे. तसेच यामुळे जिल्हातंर्गत बदली पात्र शिक्षकांना काही प्रमाणात दिलासा मिळत रिक्त जागांची संख्या वाढणार आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मागील काही दिवसांत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नियुक्या दिल्या. याशिवाय पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या शिक्षकांना जिल्ह्यात रिक्त जागी पदस्थापना देण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत 179 शिक्षक पवित्र पोर्टलने, तसेच 128 शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात विविध शाळांत दाखल झाले आहेत. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या साडेचारशे जागा रिक्त आहेत. त्यातील मोजक्या जागा शिल्लक राहिल्या होत्या.

यामुळे बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांची मोठी अडचण झाली होती. मात्र, जिल्हातंर्गत बदल्यापूर्वी पदोन्नती झाल्यास शिक्षकांची सोय होणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षक संवर्गातील पात्र उपाध्यापक, पदवीधर आणि मुख्याध्यापक शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार कार्यरत शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदांवर पदोन्नती मिळणार आहे.पदोन्नतीनंतर संबंधितांना एक वेतनवाढीचा लाभही मिळेल.

पदोन्नतीने 115 जागा भरतील
जिल्ह्यात 10 हजार 708 शिक्षकांची पदे मंजूर असून त्यातील 446 पदे आजअखेर रिक्त आहेत. याशिवाय 428 मुख्याध्यापक पदांपैकी 80 पदे पदोन्नतीने भरायची आहेत. 123 केंद्रप्रमुख पदांपैकी 40 रिक्त असून पदोन्नतीने 22 (20 मराठी व 2 उर्दू माध्यम) भरायची आहेत. विस्तार अधिकार्‍याच्या (श्रेणी 3) 80 पदांपैकी 27 मंजूर असून पदोन्नतीने 13 भरायची आहेत. ही सर्व प्रक्रिया पुढील आठवड्यात शिक्षण विभागाकडून राबवली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या