Friday, May 17, 2024
Homeनाशिकशिक्षकांना आता दुहेरी जबाबदारी

शिक्षकांना आता दुहेरी जबाबदारी

नाशिक | प्रतीनिधी | Nashik

कोरोनाच्या (corona) संकट काळात दोन वर्ष शाळा (school) बंंद राहील्याने व न शिकताच पुढच्या वर्गात गेल्याने आता तिसरी, चौथीतील मुलाकडुनही पहीली दुसरीच्या विद्यार्थ्या (students) सारखेच धडे गिरवुन घ्यावे लागत आहे.

- Advertisement -

त्यामुळे पहीली ते चौथी पर्यंंत शाळेतील शिक्षकांना (teachers) आता दुहेेरी जबाबदारी पार पाडवी लागत आहे. शिक्षकांसमोर हे खूप मोठें आव्हण आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण (education) देण्यासाठी विविध प्रयत्न करावे लागत आहेत. देशभरातील जवळपास 26 कोटी विद्यार्थ्यांना (students) कोरोना परिस्थितीचा फटका बसला. या काळात ऑनलाईन (online) आणि मोहल्ला शाळांद्वारे विद्यार्थ्यांना शिकवलें मात्र ते विद्यार्थ्यांना किती समजले आणि विद्यार्थी नक्की शिक्षणाकडे लक्ष देत होते की नाही हे समजलेच नाही.

शिक्षक (teachers) आणि विद्यार्थ्यांचा (students) थेट संपर्क नसल्यानं त्यांचे विद्यार्थ्यांकडे लक्ष गेले नाही. पहीली, दुसरीचे विद्यार्थी आता तिसरी चौथीत शिकत आहेत. मात्र त्यांनी पहीली, दुसरीतच काही न शिकल्यामुर्ळे तिसरी, चौथीत जाऊनही अभ्यास पहीली दुसरीचाही गिरवावा लागत आहे. ऑनलाईन शिक्षण (Online education) पद्धतींमधील अनेक दोष आता दिसत आहेत.

शालेय विद्यार्थी उत्तीर्ण केले जात असल्याने प्रगती अधोगती फारशी दिसली नाही. मात्र आता दहावी, बारावीची परीक्षा अतीशय कडक वातावरणात घेतल्यानंंतर त्यांचे खरे चित्र समोर येणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पळून ज्यांंनी वर्ग भरवले होते. शिक्षणात खंड पडु दिला नव्हता तेथे मात्र विद्यार्थी नेहमी सारखे प्रगत आहे.

घरी बसून अभ्यास करताना मुलें अनेक गोष्टी विसरले. अभ्यासाच्या क्षमतेत, नवीन गोष्ट समजून घेण्याच्या क्षमतेत देखील घट झाल्याचें दिसलें आहे. गत वर्षी मुलगा चौथीत होता. त्या वर्षी तो काय शिकला? हे देखील विसरला आहे.भाषा आणि गणित विषयांमध्ये मुलांंनी सर्वात जास्त क्षमता गमावली आहे. शाळा (school) सुरु झाल्यानंतर शिक्षकांना या सर्व त्रुटी आता प्रत्यक्ष जाणवत आहेत. दोन वर्ष मुले अभयासात मागे पडली आहे. त्यांंना इतरांच्या बरोबरीने मार्गावर आणण्यासाठी खुुपच प्रयत्न करावे लागत आहेत.

दोन वर्षाचे शैक्षणीक नुकसान भरुन काढण्यासाठी आता शिक्षण खाते व सर्व शिक्षण संंस्थांना व शिक्षकांना विचार करावाच लागेल. जादा वर्ग घेऊन शिकवीण्या शिवाय पर्याय राहीला नाही.

– मोहन चकोर (शिक्षणाधीकारी क्रांं. व्हेी. एन. नाईक शिक्षण संस्था)

- Advertisment -

ताज्या बातम्या