Friday, July 19, 2024
HomeUncategorizedउद्यापासून भरणार शिक्षकांची शाळा

उद्यापासून भरणार शिक्षकांची शाळा

औरंगाबाद – aurangabad

- Advertisement -

राज्यातील शाळा (School) भलेही १५ जूनपासून सुरू होणार असल्या तरी गुरुजींना मात्र उद्या अर्थात सोमवारपासूनच (१३ जून) शाळेवर जायला लागणार आहे. (corona) कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत दोन दिवस शाळा स्वच्छता (School cleanliness) , सौंदर्यीकरण, कोव्हिड-१९ प्रादुर्भाव तसेच (Student) विद्यार्थी, पालकांचा आरोग्यविषयक बाबीच्या अनुषंगाने उद्बोधन वर्ग घेतला जाणार आहे.

राज्यातील शाळा उघडण्याचा निर्णय मध्यंतरी शासनाने घेतला होता. यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. पुन्हा गुरुवारी शिक्षण विभागाने २०२२-२३ शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत नवीन निर्देश काढले. यामध्ये १३ व १४ जून रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारीच उपस्थित राहतील व १५ जूनपासून विद्यार्थ्यांसाठी शाळा असेल. सुरुवातीचे दोन दिवस सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी उक गहन शाळेची स्वच्छता करणे, सौंदर्यीकरणाची कामे करायची आहेत. त्यासह कोव्हिड-१९ प्रादुर्भाव तसेच आरोग्यविषयक वाबींच्या अनुषंगाने उद्बोधन करण्याचे नियोजन करायचे आहे. १५ जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सुचना देण्यात याव्यात असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर विदर्भातील शाळांसाठी २४ व २५ जून दरम्यान शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण, उद्बोधन करणे आदी कामे व २७ जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात याव्यात असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्राथमिक, माध्यमिक संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात निर्देश दिले आहेत.

रुग्ण संख्येमुळे खबरदारी

कोरोना रुग्णसंख्या मागील आठवड्यात पुन्हा वाढायला सुरुवात झाल्याने खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाच्या पातळीवर काळजी घेतली जात आहे.त्याचा एक भाग म्हणून शाळा सुरू झाल्यावर कसे नियोजन केले जावे याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या