Friday, April 25, 2025
Homeनगरछेड काढणार्‍या चालकाने बस सोडून ठोकली धूम

छेड काढणार्‍या चालकाने बस सोडून ठोकली धूम

करंजी बसस्थानकावरील प्रकार, तरुणीच्या धाडसाचे कौतुक

करंजी |वार्ताहर| Karanji

नगर ते पाथर्डी प्रवासादरम्यान बसमधील एका तरुणीची छेड काढणार्‍या चालकाने करंजी बसस्थानकात आल्यानंतर मार खाण्याच्या भीतीने बस सोडून धूम ठोकली. ही घटना शनिवारी (22 डिसेंबर) रात्री घडली. तरुणीने चालकाला चांगलाच धडा शिकवल्याने तिच्या धाडसाचे परिसरातून कौतूक होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नगरकडून पाथर्डीकडे जात असलेल्या पाथर्डी डेपोच्या बसमध्ये पाथर्डी तालुक्यातील एका गावची तरुणी बसमधील ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला असलेल्या सिंगल सीटवर बसलेली होती.

- Advertisement -

एसटी बस पाथर्डीकडे येत असताना या बस चालकाने या युवतीशी बोलण्याचा प्रयत्न करत तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. चालकाचे हे चाळे ओळखून या तरुणीने करंजी घाट सुरू होण्याअगोदर आपल्या घरच्यांसह नातेवाईकांना या प्रकाराबाबत कळवले. त्यानंतर कुटुंबियांनी ‘करंजीत थांब, आम्ही तिथे येतो’ असे म्हणत या तरुणीला धीर दिला. तरुणीने घरी सांगितल्याचे लक्षात येताच करंजी बसस्थानकावर एसटी पोहोचताच घाईगडबडीत बस बाजूला उभी करून प्रवासी उतरण्याअगोदर मार खाण्याच्या भीतीने चालकाने बस तिथेच सोडून धूम ठोकली. तरुणीचे नातेवाईक करंजीत पोहोचण्याच्या आत चालक पसार झाला. बसमधील इतर प्रवाशांवर मात्र रात्रीच्या वेळी करंजी बसस्थानकावर थंडीत कुडकुडत उभे राहण्याची वेळ आली. दरम्यान, पाथर्डी डेपोने या चालकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

एसटीचा प्रवास सुरक्षित ?
एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली 76 वर्षे प्रवाशांची विश्वासार्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी व सुरक्षित वाहन चालवणार्‍या चालकांचा खुप मोठा वाटा आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून आंबटशौकीन चालक-वाहकांच्या अशा कृत्यांमुळे बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...