Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यातेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अख्ख्या मंत्रिमंडळासह दोन दिवस महाराष्ट्रात

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अख्ख्या मंत्रिमंडळासह दोन दिवस महाराष्ट्रात

मुंबई | Mumbai

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर संपूर्ण लक्ष केंद्रीत केलं आहे. तेलंगणात सत्ता आल्यानंतर आता महाराष्ट्रात आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न चंद्रशेखर राव यांनी सुरू केला आहे. राज्यातील काही नेते चंद्रशेओखर राव यांच्या गळालाही लागेल आहेत. मात्र, त्यांना अजूनही राज्यातील म्हणावा तसा मोठा नेता मिळालेला नाही. या संपूर्ण पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव आज दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. त्यांचं अख्ख मंत्रिमंडळच महाराष्ट्रात येणार आहे. चंद्रशेखर राव राज्यात मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

लळा असा लावावा की…! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO

आषाढीनिमित्त तेलंगणचे मंत्रिमंडळ पांडुरंगाचे दर्शन घेणार आहे. त्यापूर्वीच आज हे मंत्रिमंडळ सोलापूर येथे मुक्कामी राहणार आहे. त्यांच्यासाठी सोलापूरमधील हॉटेलमध्ये ३०० रूम्स बुक केल्या आहेत. सोलापूरमध्ये त्यांच्या स्वागतासाठी १०० फलक लावल्याचे बीआसएसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी हा ताफा पंढरपूरकडे रवाना होईल. यावेळी बीआरएसच्या वतीने शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बीआरएसने राज्यात हातपाय पसरणे सुरू केले आहे. यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. चंद्रशेखर राव यांच्या या दौऱ्यात पंढरपुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगिरथ भालके बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहे. तत्पुर्वी राव यांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठवून चर्चेसाठी हैदराबादला बोलावून घेतले होते. त्यांच्यात झालेल्या चर्चेंतर भालके यांनी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी भालके यांनी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या