Thursday, September 19, 2024
Homeक्राईमNashik News : गांज्याचे कनेक्शन तेलंगाणा व्हाया नाशिक

Nashik News : गांज्याचे कनेक्शन तेलंगाणा व्हाया नाशिक

पंचवटीतील लक्ष्मी ताठे ताब्यात, मुलाचीही चाैकशी हाेण्याची शक्यता

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

तेलंगाणा पाेलिसांनी (Telangana Police) काही दिवसांपूर्वी जप्त केलेल्या १९० किलाे गांजाची (Ganja) साखळी नाशिकपर्यंत येऊन पाेहाेचली आहे. कारण, गांजा तस्करी प्रकरणात तेलंगाणा पाेलिसांनी लक्ष्मी ताठे या संशयित महिलेचा (Woman) ताबा घेऊन बुधवारी तेलंगाणा गाठले आहे. या घटनेने पंचवटीत खळबळ उडाली आहे. तर येत्या काही दिवसांत ताठे हिच्या मुलाची चाैकशी हाेण्याची दाट शक्यता असून तेलंगाणा पाेलिसांनी पंचवटी पाेलिसांशी समन्वय साधत ताठे हिचा ताबा मिळविला. 

हे देखील वाचा : संपादकीय : ११ जुलै २०२४ – अंमलबजावणी विवेकबुद्धीवर अवलंबून?

 तेलंगाणा राज्यातील वारगल जिल्ह्यातील धामेरा पोलिस ठाण्यात (Dahamera Police Station) दाखल गांजा तस्करीच्या गुन्ह्यात संशयितांना अटक (Arrested) झाली आहे. या संशयितांनी पोलिस चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार संशयित लक्ष्मी ताठे हिचा सहभाग उघड झाला. त्यावरुन तेलंगणातील न्यायालयाने ताठे हिच्या अटकेचे ‘वॉरंट’ जारी केले. त्यानुसार बुधवारी (दि. १०) दुपारी धामेरा पोलिस नाशिक शहरात दाखल झाले. त्यांनी पंचवटी पोलिसांची मदत घेत ताठे हिला ताब्यात घेतले.

हे देखील वाचा : मोबाईलच्या वादातून मारहाण करत तरुणाचा खून

दरम्यान, सन २०१८ मध्ये तपाेवनात (Tapovan) शहर गुन्हे शाखा पथकाने गांजा तस्करीत ताठे हिला अटक केली होती. तिने ओडिशा राज्यातून सहाशे ऐंशी किलो गांजा तस्करी केली होती. या गुन्ह्यात ताठेसह सिन्नर, जळगाव व उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील संशयितांनाही बेड्या ठोकल्या होत्या. दरम्यान, ताठे या दोन वर्षांपूर्वी शिवसेना शिंदे गटात सक्रीय होत्या. मुंबई नाका पोलिस ठाण्यांत (Mumbai Naka Police Station) झालेल्या वादावादीनंतर त्यांची शिंदे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर ताठे या राजकारणात सक्रिय नव्हत्या. 

हे देखील वाचा : Nashik Crime News : गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक

गांजाचे तेलंगाणा व्हाया नाशिक कनेक्शन उघड

गांजा तस्करी प्रकरणी तेलंगाणा पाेलिसांच्या अटकेत असलेल्या संशयितांनी लक्ष्मी ताठे हिचे नाव उघड केले. त्यानुसार गांजाचे तेलंगाणा व्हाया नाशिक कनेक्शन उघड झाले. संशयित ताठे हिने गांजा खरेदी करुन वाहतूक करण्यास सांगितल्याचे तेलंगाणा पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे उत्तर महाराष्टात गांजा तस्कर, विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गांजा तस्करीत ताठेंचा सहभाग उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या