Saturday, May 9, 2026
Homeजळगावएक कोटी ६० लाखांच्या कामांची निविदा रद्द

एक कोटी ६० लाखांच्या कामांची निविदा रद्द

जळगाव| jalgaon

नियमबाह्य (Out of order)चुकीच्या(Wrong) पध्दतीने निविदा प्रक्रिया (Tender process) राबविल्यामुळे नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेतर्ंगत (Urban Dalit Non-Slum Improvement Scheme) एक कोटी ६० लाखांच्या कामांच्या निविदा रद्द (Tender canceled) करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या महापालिका स्थायी समिती सभेत (Municipal Standing Committee Meeting) घेण्यात आला आहे. दरम्यान सभेत १३ विषयांपैकी ९ विषयांना मंजुरी देण्यात आली असून ४ विषय नामंजूर करण्यात आले आहे.

- Advertisement -

मनपा स्थायी समितीची सभा सोमवारी सभापती राजेंद्र घुगे-पाटील (Speaker Rajendra Ghuge-Patil) यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पार पडली. यावेळी व्यासपीठावर अपर आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे, उपायुक्त प्रशांत पाटील, संतोष वाहुळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी कपिल पवार उपस्थित होते.

नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेतर्ंगत किंवा अन्य निविदा काढतांना चुकीच्या पध्दतीने प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप सभेत नितीन लढ्ढा यांनी केला. हाच धागा पकडून अन्य सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत, निविदा रद्द करण्याची मागणी केली. त्यावर सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी आक्षेप घेवून महापालिकेचे आर्थिक नुकसान होईल, त्यामुळे निविदा रद्द करु नये असे सांगितले. मात्र योजनेतर्ंगत उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण कामे व्हावीत या अनुषंगाने चुकीच्या पध्दतीने राबविण्यात आलेल्या १ कोटी ६० लाखांच्या कामांच्या निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरात डेंग्यूचा उद्रेक
जळगाव शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनीया सारख्या साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. मात्र मनपा प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी नाराजी व्यक्त करुन अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले.

ताज्या बातम्या

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर : चांदवड तालुक्यातील निंबळे ग्रामपंचायतीचा ‘सुशासन’ श्रेणीत...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या 'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५' मध्ये महाराष्ट्राने आपल्या यशाच्या पाऊलखुणा उमटवत राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली...