Thursday, May 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजThackeray Family : राज ठाकरेंच्या शेजारी आदित्य, तर उद्धव ठाकरेंच्या शेजारी अमित;...

Thackeray Family : राज ठाकरेंच्या शेजारी आदित्य, तर उद्धव ठाकरेंच्या शेजारी अमित; सुप्रिया सुळेंनी बजावली महत्वाची भूमिका, नेमकं काय घडलं?

मुबंई | Mumbai

मराठीच्या मुद्द्यावर (Marathi Language) एकत्र आज तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र आले. त्यामुळे संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे या सोहळ्यात केवळ ठाकरे बंधूचं नव्हे तर ठाकरे कुटुंबिय एकत्र पाहायला मिळाले.यामुळे ठाकरेंची चौथी पिढी एकत्र व्यासपीठावर दिसून आली.

- Advertisement -

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि त्यांचे चुलत भाऊ मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी देखील मराठीच्या मुद्द्यावरून आयोजित विजय जल्लोष मेळाव्यासाठी एकत्र आले होते. यावेळी, शेजारीच उभ्या असलेल्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना हाताला धरुन पुढे घेतले. त्यानंतर राज ठाकरेंच्या शेजारी आदित्य आणि उद्धव ठाकरेंच्या शेजारी अमित यांना उभे करत आत्याबाईंची भूमिका बजावल्याले बघायला मिळाले.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. हा क्षण पाहून अवघा महाराष्ट्र (Maharashtra) भावूक झाल्याचे दिसून आले. तसेच हा विजयी मेळावा संपल्यानंतर ठाकरे कुटुंबियांनी एकत्र फोटो देखील काढले. यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...