इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
येथील घोटी टोल नाका (Ghoti Toll Booth) परिसरात आज उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन (Agitation) करत टोलनाका बंद केल्याने दोन्ही बाजुने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. तसेच या आंदोलनामुळे काही काळ मुंबई नाशिक आग्रा महामार्ग (Mumbai Nashik Aagra Mahamarg) बंद पडला होता.
हे देखील वाचा : Union Budget 2024 : अर्थसंकल्पात शेती क्षेत्राला काय मिळालं? जाणून घ्या सविस्तर
या आंदोलनात माजी आमदार निर्मला गावित, वसंत गिते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाहीत तोपर्यंत विना टोल गाड्या सोडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील घोटी तसेच इगतपुरी परिसरामध्ये (Igatpuri Area) अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाचे देखील काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे होणाऱ्या अपघात थांबावेत या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
हे देखील वाचा : Budget 2024 : अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? फडणवीसांनी थेट यादीच वाचली
दरम्यान, या आंदोलनात पुरुष कार्यकर्त्यांबरोबर महिला कार्यकर्त्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी (Shivsena Worker) विना टोल काही वाहने सोडले.या महामार्गावरील खड्ड्यांमुळे मुंबई नाशिक अंतर कापण्यासाठी सहा ते सात तास लागतात. त्यामुळे वाहन चालकांकडून टोल न घेण्याची मागणी करत टोलनाका बंद करण्यात यावा अशी मागणी या आंदोलकांनी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा