Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्याVIDEO : ठाण्यात शिंदे-ठाकरे गटात जोरदार राडा; पोलिसांकडून लाठीचार्ज

VIDEO : ठाण्यात शिंदे-ठाकरे गटात जोरदार राडा; पोलिसांकडून लाठीचार्ज

ठाणे | Thane

- Advertisement -

शिवसेनेतील फुटीनंतर ठाणे शहरात सुरू झालेला राजकीय संघर्ष अजूनही थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. ठाण्यातील किसन नगर परिसरात काल रात्री ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठा राडा झाला. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

किसनगर विभागातील भटवाडी परिसरात ठाकरे गटाचे संजय घाडीगावकर यांच्या माध्यमातून सोमवारी रात्री एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे ही उपस्थित होते. त्याचवेळी शेकडो शिंदे गटाचे कार्यकर्ते त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

इतकेच नाही ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. शिंदे गटाच्या महीलाकरत्या यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. या हल्ल्यामध्ये एक जण जखमी झाला आहे. या जखमी कार्यकर्त्याला ठाण्याचा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. ही प्रक्रिया संपवून विचारे मंगळवारी पहाटे चार वाजता पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर बाहेर जमलेल्या शिंदे गटाच्या समर्थकांपैकी एकाने पाणी फेकण्याच्या प्रयत्न केला. तसेच विचारे यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना मारहाण देखील केली.

यानंतर पोलिसांकडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या दरम्यान दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यामुळे श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या