Friday, May 3, 2024
Homeनाशिक‘थँक अ टिचर’ उपक्रम

‘थँक अ टिचर’ उपक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कित्येक महिने शाळा बंद व हिरमुसलेल्या अवस्थेत उभ्या आहेत. परंतु, केवळ मुलांना शिक्षित करण्यासाठी शिक्षक तसेच सेवक पूर्वीपेक्षा ठाम उभे राहून ज्ञानदानाचे काम करत आहेत.

- Advertisement -

शिक्षकांच्या याच कामगिरीला सलाम करण्यासाठी येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी ‘थँक अ टिचर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये ‘शिक्षक’ हा महत्वाचा दुवा असतो. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत आहेत. त्यासाठी शिक्षकांची नवीन कोशल्य, नवीन शैक्षणिक साधने वापरण्याची इच्छा दिसून येते. केवळ शाळेमध्ये जाऊन शिकवणे, या पलीकडे जाऊन आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षक मुलांना शिक्षण देत आहेत.

ज्या ठिकाणी काही शिक्षक स्वतः पुढाकार घेऊन मुलांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना ज्ञानदान देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहेत, असे हे शिक्षक निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये जे अमुलाग्र बदल झाले, जी प्रगती झाली. ती शब्दरूपाने व्यक्त करण्यासाठी ‘थँक अ टिचर’ ही मोहीम राबविली जाणार आहे.

करोना प्रादुर्भावामध्ये ही शिक्षक ज्ञानदानाचे काम करत आहेत, अशा शिक्षकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. तसेच आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे शिक्षक येतात की, ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला नवीन वळण मिळत जाते. शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करावा यासाठी ही मोहीम 5 सप्टेंबर 2020 पासून सुरू केली जाणार आहे. या उपक्रमाची सुरूवात सोशल माध्यमाद्वारे सुरू केली जाईल.

अभियानामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक, शिक्षक, अधिकारी यांनी सहभागी होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या