Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या‘ती’ नोटीस झाडे तोडण्यासाठी नव्हे तर फक्त छाटणीसाठी

‘ती’ नोटीस झाडे तोडण्यासाठी नव्हे तर फक्त छाटणीसाठी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महापालिकेच्यावतीने (Municipal Corporation) झाडांवर जी नोटीस (notice) चिटकवण्यात येते, त्यावर तोडणे तसेच वृक्ष पुनर्रोपण (Tree replanting) करणे व छाटणी करणे या प्रकारचे पर्याय असतात. काही झाड तोडायचे असतात तर काहीचे पुनर्रोपण होते तर काही फक्त छाटणीसाठी असते.

- Advertisement -

नवीन नाशिकच्या (navin nashik) प्रवेश द्वारावर असलेले सुमारे 200 हुन अधिक वर्षे जुने वडाचे झाड (banian tree) तोडण्यासाठी नव्हे तर फक्त त्याच्या फांद्या छाटणीसाठी नोटीस लावण्यात आली होती, मात्र महापालिकेच्या सेवकांनी विशेष खूण केली नसल्याचा दावा महापालिका आयुक्त कैलास जाधव (Municipal Commissioner Kailas Jadhav) यांनी केला आहे. तसेच ते झाड रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे ते तोडण्यात येणार नाही. फक्त त्याच्या काही फांद्या छाटण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मी स्वतः पर्यावरण प्रेमी असून आतापर्यंत वृक्ष प्राधिकरण समितीकडे आलेल्या प्रस्तावापैकी सुमारे शंभरपेक्षा जास्त झाडे वाचवली आहेत. यामध्ये नारळाचे झाड, आंब्याचे झाड आदींचा समावेश आहे. आरोग्य (health), पर्यावरण (environment) व शिक्षण (education) या तीन विभागावर विशेष लक्ष दिले आहे. सध्या नवीन नाशिक भागातील उड्डाणपुलाचा (flyover) विषय गाजत आहे.

शेकडो वर्ष जुने झाडें यामध्ये कत्तली करण्यात येणार असल्यामुळे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी फोनवर चर्चा करून याबाबत सूचना केल्या होत्या. ठाकरे यांनादेखील महापालिका आयुक्त जाधव यांनी दोनशे वर्षांपूर्वीचे झाड तोडण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे.

या दोनशे वर्षे जुन्या झाडाच्या बाजूने मार्ग आहे तर तेथे उड्डाणपुलाच्या पीलरपासून झाड लांब आहे. यामुळे या झाडाला तोडण्याचे काहीच कारण नाही. फक्त उड्डाणपूल जवळ उंचीवर खालून लागणार्‍या काही फांद्या छाटण्यात येणार आहे, यासाठी ही नोटीस लाण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

समिती स्थापन

दरम्यान, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेच्या उद्यान विभाग तसेच बांधकाम व नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त समिती स्थापन केली आहे. समितीला गुगल मॅप द्वारे तसेच प्रत्यक्ष जाऊन सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. उड्डाणपुलादरम्यान येणारे पिल्लर तसेच झाडांची होणार अडचण याबाबत अचूक अंतर मोजून तसे अहवाल देण्याचे आदेश आयुक्त जाधव यांनी दिली आहे.तर उड्डाणपुलाच्या कामात येणार्‍या अडचणी तसेच वृक्षांची संख्या याबाबत सविस्तर पाहणी करून दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या