Friday, May 17, 2024
Homeधुळेजिल्ह्यात श्रींच्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

जिल्ह्यात श्रींच्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

धुळे |Dhule | प्रतिनिधी

गणपती विसर्जनासाठी जिल्हा व महापालिका प्रशासन पोलीस यंत्रणा सज्ज झाले असून त्या दृष्टीने तयारी झालेली आहे. जिल्ह्यात ५९५ मंडळांनी गणपतींची स्थापना केली. तसेच काही गावांनी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविला आहे. सहा टप्प्यात गणपतींचे विसर्जन करण्याचे नियोजन केले असून आतापर्यंत ३५० मंडळातर्फे गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. शेवटच्या टप्प्यात अनंत चतुर्दशी दिवशी २०० मंडळातर्फे आणि घरगुती गणपतींचे विसर्जन होत आहे. त्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे.

- Advertisement -

महापालिकेची यंत्रणा गणेशमूर्ती विसर्जनासाठी सज्ज झाली आहे. प्रशासनातर्फे अनंतचतुर्दशीच्या दिवशी पांझरा नदीसह मिरवणुकीच्या मार्गात विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी शंभरावर कर्मचारी नियुक्त केले आहेत.

निर्माल्याचे संकलन- पांझरा नदी किनारी महापालिकेतर्फे अनंतचतुर्दशीच्या दिवशी स्वामी समर्थ मंदिर ते अंजन शाह बाबा दर्गा, कालिकादेवी मंदिर ते गणपती मंदिर, समतानगर ते एसआरपी कॉलनी, मोगलाई गणेश बंधारा, एसटी कॉलनी ते गणपती मंदिर, हत्तीडोह आदी ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे घंटागाड्या, डंपर, रिक्षा थांबतील. याशिवाय निर्माल्य संकलनासाठी कुंड्या ठेवण्यात येतील असे आरोग्य विभागाने सांगितले.

प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यासाठी शंभर कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कराचीवाला खुंट ते पाचकंदील, पाचकंदील ते मच्छीबाजार, संपूर्ण देवपूर आग्रा रोड ते हत्तीहोड, मनोहर चित्रपटगृह ते मालेगाव रोड या भागात दहा कर्मचार्‍यांचे पथक कार्यरत असेल.

वैद्यकीय सुविधा- गणेश विसर्जनाच्या दिवशी मिरवणूका काढण्यात येतात. त्या दरम्यान लहान मोठे अपघात होण्याची शक्यता गृहित धरून खबरधारी म्हणून विविध महत्वाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा महापालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. वैद्यकीय पथकासह महापालिकेची रुग्णवाहिका कार्यरत ठेवण्यात आली आहे.

नकाणेत विसर्जन नाही- पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होऊ नयेत म्हणून शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नकाणे व डेडरगाव, हरण्यामाळ तलावात गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आज गणपती विसर्जनाच्या दिवशी कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी एक पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, डीवायएसपी, १७ पोलिस निरिक्षक, २३ सहाय्यक पोलिस निरिक्षक, ४२ उपनिरीक्षक आणि १८०० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलीस यंत्रणेने बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलिस दल व गृहरक्षक दलाची मदत घेण्यात आली आहे. राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी, ५०० पुरुष होमगार्ड आणि १५० महिला होमगार्ड बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या