Thursday, May 2, 2024
Homeनगरलॉयर्स को-ऑप सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन संपन्न

लॉयर्स को-ऑप सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन संपन्न

अहमनगर (प्रतिनिधी)

अहमदनगर लॉयर्स को-ऑप सोसायटीची २०१९-२० ची वार्षिक सर्वसाधारण सभा लॉयर्स सोसायटीचे चेअरमन ॲड. नानासाहेब पादीर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

- Advertisement -

यावेळी व्हाईस चेअरमन ॲड.प्रभाकर शहाणे, सेक्रेटरी ॲड.रफिक बेग आदिंसह लॉयर्स सोसायटीचे संचालक व वकिल सभासदही ऑनलाइन सहभागी झाले होते. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर होत साधक बाधक चर्चा होत खेळीमेळीत ही सभा संपन्न झाली.

यावेळी बोलतांना चेअरमन ॲड. नानासाहेब पादीर म्हणाले, लॉयर्स सोसायटीचे सर्व सभासद वकिलांच्या सहकार्यामुळे उत्कृष्ट काम चालू आहे. गेल्या वर्षी आलेल्या करोना व्हायरसच्या संकटामुळे न्यायालयाचे कामकाज अद्याप पूर्ण क्षमतेने चालू नाहीये. याचा मोठा परिणाम लॉयर्स सोसायटीवर झाला असला तरी लॉकडाऊन काळातही लॉयर्स सोसायटीने चांगले काम करत ऑडीटचा ‘अ’ वर्ग कायम राखत चार कोटीहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे. येत्या वर्षात सभासदांना शेअर सर्टिफिकीट देण्याचा मानस आहे. यापुढील काळातही लॉयर्स सोसायटीच्या माध्यामातून सभासद वकिलांना जास्तीतजास्त चांगल्या सुविधा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

यावेळी व्हाईस चेअरमन ॲड.प्रभाकर शहाणे, सेक्रेटरी ॲड.रफिक बेग, ॲड.अरविंद मुळे आदींनी सभासदांच्या शंकांचे समाधान केले. यावेळी संचालक ॲड. सुधीर टोकेकर, ॲड.बाळासाहेब गोफणे, ॲड.सुरेश कोहकडे, ॲड.रविंद्र शितोळे, ॲड. स्वाती नगरकर, ॲड.सविता कराळे, ॲड.सुरेश ठोकळ, ॲड.चंद्रकांत शेकडे, ॲड.मंगेश सोले, ॲड.शिवाजीराव अनभुले, ॲड.बी.एस.खांडरे, व्यवस्थापक अश्विनी पवार, एस.एल.दंडवते, एस.ए.घोलप, ए.ए.मुळे आदि कर्मचारी आदींसह सभासद ऑनलाइन उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या