Friday, May 3, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद खंडपीठात 19 एप्रिल ते 7 मे पर्यंत फक्त तातडीच्या याचिकांवरच होणार...

औरंगाबाद खंडपीठात 19 एप्रिल ते 7 मे पर्यंत फक्त तातडीच्या याचिकांवरच होणार सुनावणी

औरंगाबाद – Aurangabad

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आता 19 एप्रिल ते 7 मेदरम्यान केवळ अत्यावश्यक याचिका दाखल करण्यात येवून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे सुनावणी घेतली जाणार आहे. तसेच प्रत्येक न्यायालयाला आठवड्यातून केवळ दोनच दिवस न्यायालीयन कामकाज देण्यात आले आहे.

- Advertisement -

यापूर्वी, उच्च न्यायालयाने राज्य सरकारच ब्रेक दी चेन अंतर्गतच्या उपायांच्या अनुषंगाने आठवडाभर पूर्णपणे सुटी जाहीर करुन केवळ ठराविक सुटीकालीन न्यायालयांसमोर व्हिसीव्दारे महत्वाच्या प्रकरणांवर सुनावणीचे कामकाज सुरु ठेवले होते. आता 19 एप्रिल ते 7 मेपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी एक व दुपारी 1.45 ते 3.45 या सत्रात चार तास केवळ व्हिसीव्दारे अतितातडीच्या प्रकरणांवर सुनावणीचा निर्णय घेतला आहे.

तसेच राज्यातील सर्व प्रकराच्या कनिष्ठ न्यायालयांमध्ये केवळ सकाळी 11 ते दीड या एका सत्रात अडीच तास न्यायालयीन कामकाज चालेल. या वेळेत केवळ रिमांड, फौजदारी व दिवाणी स्वरुपाच्या अत्यंत तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी होणार आहे. 19 एप्रिल ते 7 मे दरम्यान प्रत्येकी चार कोर्ट सुरु राहतील. तसेच जिल्हा व सत्र न्यायालयातील वरील तारखेस कर्तव्यावर नसलेल्या इतर न्यायिक अधिकार्‍यांनी तात्काळ दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांचे कामकाजासंबंधीचा कार्यभार संभाळावे, असे कार्यालयीन आदेश प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांनी जारी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या