Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPM Narendra Modi: "भारताचा सर्वात मोठा शत्रू असेल तर तो म्हणजे…"; मोदींचा...

PM Narendra Modi: “भारताचा सर्वात मोठा शत्रू असेल तर तो म्हणजे…”; मोदींचा अप्रत्यक्षपणे अमेरिकेला टोला

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (२० सप्टेंबर) गुजरातमधील भावनगर येथे आयोजित ‘समुद्र से समृद्धी’ कार्यक्रमावेळी देशभरातील विविध महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांसाठी एकूण ३४,२०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक खर्च येणे अपेक्षित आहे. यावेळी मोदी यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले, “या जगात आपला कोणीही शत्रू नाही. भारताचा कोणी शत्रू असेल तर तो म्हणजे इतर देशांवरील आपले अवलंबत्व. आपण आत्मनिर्भर (स्वावलंबी) झालो तर या शत्रूवर आपण सहज मात करू शकतो.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल २६३५४ कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यांत, छारा बंदरावर एचपीएलएनजी री-गॅसिफिकेशन टर्मिनल, गुजरात आयओसीएल रिफायनरीमध्ये ॲक्रिलिक्स अँड ऑक्सो अल्कोहोल प्रकल्प, ६०० मेगावॉटचे ग्रीन शू इनिशिएटिव्ह, पीएम-कुसुम योजनेअंतर्गत ४५७ मेगावॉट सोलर फीडर, ४५ मेगावॉटचा बादेली सोलर प्रकल्प, कच्छमधील धोर्डो हे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे गाव बनणे, भावनगर आणि जामनगर येथील सरकारी रुग्णालयांचा विस्तार, ७० किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे चार-पदरीकरण आदी कामांचा समावेश आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत आज विश्वबंधूच्या भावनेने मार्गक्रमण करत पुढे जात आहे. या जगात आपला कोणीही मोठा शत्रू नाही. खऱ्या अर्थाने आपला कोणी मोठा शत्रू असेल तर तो म्हणजे आपले दुसऱ्या देशावरील अवलंबत्व. तोच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आपण सर्वांनी मिळून भारताच्या या शत्रूला पराभूत करुया. दुसऱ्या देशावरील अवलंबत्व नावाच्या या शत्रूला आपण पराभूत केलेच पाहिजे. कुठल्याही स्थितीत आपल्याला त्यावर मात करावी लागेल.

YouTube video player

मोदी पुढे म्हणाले, जगभरात शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी जगात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या या आपल्या देशाला स्वावलंबी व्हावेच लागेल. आपण दुसऱ्या देशांचे आश्रित बनून राहिलो तर आपला आत्मसन्मान दुखावेल. १४० कोटी लोकसंखेच्या या देशाचे भविष्य आपण दुसऱ्या देशांच्या हाती सोपवू शकत नाही. जर आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो, तर आपला स्वाभिमान आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य दोन्ही धोक्यात येईल.” एवढेच नाही तर, आत्मनिर्भर भारतच देशाच्या शक्ती, सन्मान आणि स्थैर्याचा आधार बनेल, असेही मोदी म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: विमान अपघाता होण्याआधी अजित पवारांचं कोणाशी झालं संभाषण? समोर...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. अजित पवार हे कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेले नेते...