Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या 'त्या' युवकाचा मृतदेह अखेर सापडला

Nashik News : पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह अखेर सापडला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रविवारी (दि.४) रोजी गोदावरी नदीला (Godavari River) आलेल्या पुरात (Flood) गोदाघाटावरून वाहून गेलेल्या २९ वर्षीय यग्नेश राकेश पवार (रा. लक्ष्मीनगर, ओझरमिग, निफाड) या विद्युत अभियंत्याचा मृतदेह (Body) मंगळवारी (दि. ६) सायंकाळी माडसांगवी येथील रेल्वेपुलाखाली असलेल्या पानवेलीत सापडला. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाकडून गेल्या तीन दिवसांपासून शोधकार्य सुरू होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : गंगापूर धरणातून दुपारी तीन वाजता ‘इतक्या’ क्युसेकने पाण्याचा विसर्ग

यग्नेश हा रविवारी (दि. ४) सकाळी गोदाघाटावर (Godaghat) कालसर्प योगाची पूजाविधी करण्यासाठी कुटूंबियांसह आला होता. निळकंठेश्वर मंदिराजवळ पूजा आटोपल्यानंतर तो पुराच्या पाण्यात पाय धुण्यासाठी गेला असता, त्याचा पाय घसरला आणि तो तोल जाऊन पुराच्या पाण्यात पडला. काही क्षणात तो पुराच्या पाण्यात (Water) दिसेनासा झाला. डोळ्यादेखत मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला. तेव्हापासून यग्नेश पवार याचा शोध सुरू होता. परंतु, दोन दिवस उलटूनही अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला यग्नेशचा मृतदेह सापडला नव्हता.

हे देखील वाचा : Nashik Rain News : रामकुंड परिसरातून २९ वर्षीय युवक पुराच्या पाण्यात गेला वाहून; आईने फोडला टाहो

दरम्यान, मंगळवारी (दि.६) दुपारी पुन्हा नाशिकरोड अग्निशमन दलाचे (Nashik Road Fire Brigade) पथक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाकडून एकलहरे परिसरातील नदीपात्रात शोध सुरू होता. त्यावेळी गंगावाडी-मांडसांगवी येथील रेल्वे पुलाखाली असलेल्या पानवेलींमध्ये मृतदेह अडकल्याचे स्थानिक मासेमारांनी पथकाला सांगितले. त्यानुसार, पथकाने शोध मोहीम सुरू केली असता, सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पानवेल्यांमध्ये अडकलेला यग्नेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...