Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबारअखेर ४० तासानंतर बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला

अखेर ४० तासानंतर बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला

नवापूर । श.प्र- NAVAPUR

गेल्या ४० तासापासून नवापूर शहरातील चरणमाळ घाटातील काका काकी नावाने प्रचलित असलेल्या धबधब्यात बेपत्ता झालेल्या २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह धबधब्याच्या पाण्यावर तरंगतांना आढळला.

- Advertisement -

नवापूर शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी अब्दुलभाई घरैया यांचा मुलगा महम्मद (वय 22) हा आपल्या मित्र व नातेवाईकांसोबत दि.27 रोजी चरणमाळ घाट परिसरातील सप्तशृंगी स्थान असलेल्या काका काकी धबधबा येथे सहलीला गेले होता.

दि 27 रोजी सांयकाळी सहलीचा आनंद घेतल्यानंतर सर्व युवक आपल्या वाहनाजवळ आले असता 22 वर्षीय महम्मद दिसून आला नाही. त्यामुळे त्याचे 24 तासापासून शोधकार्य सुरू होते. युवकाचे नातेवाईक आणि नवापूर शहरातील युवकांनी संपुर्ण परिसर पिंजून काढला होता परंतु त्यांना निराशाच लागली होती.

शेवटचा पर्याय म्हणून नातेवाईकांनी नंदुरबार येथून ड्रोन कँमेराच्या सहाय्याने शोधण्याचा प्रयत्न केला. तो ही निष्पळ ठरला होता. अखेर पाण्यात अडकून असलेला युवकाचा मृतदेह सकाळी गुरे चारणार्‍या व्यक्तीला दिसल्याने त्याने स्थानिक पोलीस पाटील यांना कळवले.

आज सकाळी बोरझर येथील पोलीस पाटील यांनी नवापूर पोलिसांना दूरध्वनीद्वारे मृतदेह धबधब्याजवळ पाण्यात तरंगत असल्याचे कळवले आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी युवक असलेल्या राहत्या घर गर्दी केलेली दिसून आली होती.

घटनाक्रम….

नऊ-दहा मुले चरणमाळ (ता. नवापूर) जंगलातील काका काकी धबधब्यावर फिरायला गेले. मात्र धबधबा परिसरातून 21 वर्षीय युवक बेपत्ता झाला होता. सदर धबधबा हा डांग (गुजरात) आहे. दि.27 रोजी सायंकाळी सहा वाजेला ही घटना घडली..

नवापूर शहरात रविवारी जनता कर्फ्यू असल्याने सर्व बाजारपेठ बंद असल्याने सुट्टीची संधी साधत शहरातील नागरिक आपल्या परीने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी फिरायला जातात.

काही स्थानिक ग्रामस्थांनी अशी माहिती दिली की गुजरात राज्यात रात्री साडे अकराच्या सुमारास एक व्यक्तीचा आवाज जंगलातून येत होता. परंतू तो कोणाचा आवाज होता हे कळाले नाही. युवकाला शोधण्यासाठी जंगलात चार टिम रवाना झाल्यात आहेत.

पोलीस, नातेवाईक, मित्रासह स्थानिक ग्रामस्थासह 400 लोक चरणमाळ जंगलात टिम तयार करुन युवकाला शोधत होते. मात्र कोणाला ही सापडला नाही. परंतू आज सकाळी गुराख्याला त्या युवकाचा मृतदेह दिसून आला.

मोहम्मद अब्दुल खालिक घरिया हा युवक लाईट बाजारातील घरिया किराणा दुकानदाराचा मुलगा आहे.

काका काकी धबधबा….

काका काकी धबधबा हा नंदुरबार, धुळे, गुजरात राज्यातील डांग, तापी जिल्ह्यातील सीमावर्ती भागात येतो. येथे अनेक पर्यटक सहलीसाठी येत असतात. धबधब्याखाली खोल पाणी आहे. या पाण्यात देखील स्थानिक लोकांनी शोध घेतला.

परंतू काही मिळून आला नाही. नवापूर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी यासंदर्भात गुजरात राज्यातील पोलीस व वन खात्याला माहिती देऊन शोध मोहीमसाठी मदत घेतली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या