Monday, May 6, 2024
Homeजळगावजिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत वाकोद नाल्यावरील पूल गाजला

जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत वाकोद नाल्यावरील पूल गाजला

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

वाकोद (Wakod) गावाजवळील नाल्यावर (nala) बांधलेला पुल (bridge built) पूर्णपणे भराव न टाकता अपुर्ण कामांचे (Incomplete works) संपुर्ण बिल (Bill) काढण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य(Zilla Parishad Member) अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी स्थायी समितीच्या (Standing Committee) बैठकीत केला. त्यावरुन या कामाची तातडीने चौकशी (Inquiry) करुन चार दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी (ZP Chief Executive Officer) डॉ.पंकज आशिया (Dr. Pankaj Asia) यांनी दिले.

- Advertisement -

वाकोद गाव आणि विस्तारीत गाव या दोन्हीमधून जाणार्‍या नाल्यावर पुल (Nala bridge) बांधण्यात आला आहे. हे काम जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून (Cess Fund) मंजुर करण्यात आले होते. जळगावातील एका कंत्राटदाराने (Contractor) हे काम घेतले होते. नाल्यावर सहा पाईप टाकून हा मोरी (Mori) प्रकारातील पुल बांधण्यात आला आहे.

या मोरीतून नाल्याचे पाणी सहज वाहू शकते. मात्र, पुलाला दोन्ही बाजुने भरावच (Fill in the blanks) टाकलेला नसल्याने पुलाचा उपयोग केवळ सांडपाणी वाहून जाण्यासाठी होत आहे. विशेष म्हणजे जि.प.बांधकाम विभागाने (Construction Department) काम पुर्ण झाल्याचे मान्य करून कामाचे संपुर्ण बिल (Full bill) ठेकेदाराला अदा (Paid) केले आहे.

या पुलाची चौकशी (Inquiry) करावी, अशी मागणी सदस्य अमित देशमुख यांनी आज ा स्थायी समितीच्या सभेत केली. त्यावर जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी या कामाची चार दिवसात चौकशी करण्याचे आदेश (Order) दिले आहेत.

दरम्यान, जि.प.बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (Executive Engineer) सुधीर ढिवरे (Sudhir Dhiware) यांनी या कामाची चौकशी करून संबंधित अभियंता आणि ठेकेदारावर कारवाई (Action) करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, वाकोद नाल्यावरील पुलाचे काम 3 लाख 72 हजार रुपयांचे होते. ते पुर्ण झाले असून या कामाचे बिल देखील मिळाले आहे. इस्टीमेटप्रमाणे काम (Work as estimated) पुर्ण केले आहे. निधी कमी असल्याने घरून पैसे टाकून काम पुर्ण केल्याचा दावा ठेकेदार सुरज नारखेडे (Contractor Suraj Narkhede)यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या