Friday, May 3, 2024
Homeजळगावदुकान उघडणे पडले महागात, चौघांवर गुन्हा दाखल

दुकान उघडणे पडले महागात, चौघांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कोरोनासंदर्भात घालून दिलेल्या नियमांना न जुमानता व्यवसाय करणार्‍या चार दुकानदारांना दुकान उघडे करणे चांगले महागात पडले आहे. त्यांच्यावर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला. यात मनोज रघुनात चिंचोले, (नवनाथ कापड दुकान), आनंद प्रभाकर कुलकर्णी (बालजी झेरॉक्स), राहुल बनवराव शिनकर (योगेश्‍वर सोडा वॉटर), कमेलश झुबरलाल जैन(किरण बुक डेपो) आदिचा समावेश आहे.

- Advertisement -

तसेच नगरपालीकेच्या उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे,सहाय्यक रचनाकार नितीन देवरे, कुणाल महाले, प्रविण तोमर, सचिन निकुंभ, जितेंद्र जाधव, अनिल येवले, शांताराम चौधरी, विलास निकम अशांच्या पथकाने छापे टाकून कारवाई सत्र केले. अत्यावश्यक सेवेतील ज्या दुकानांना शासनाने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे अशा व्यावसायीकाने स्वत: लस घेतलेली पाहिजे. यासह अनेक निर्बंध या व्यावसायीकांवर असतांना त्याची अंमलबजावणी करीत नसलेल्या व्यावसायीकांवर दंडात्मक कारवाईचे सत्र न.पा.चे चालू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या