नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिकरोड व परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित व ‘ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ प्रायोजित ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो 2025’चा शानदार समारोप करण्यात आला. प्रदर्शनाच्या तीनही दिवस परिसरातील नागरिकांनी विविध बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देऊन आपल्या स्वगृहस्वप्नपूर्तीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली.
मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रशस्त मार्ग खुल्या करणाऱ्या प्रदर्शनाच्या तीन दिवसांत बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ‘देशदूत’ वठवत असलेली भूमिकाही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात भावली. फायनान्शियल पार्टनर नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक, तर पर्यावरणीय पार्टनर पपायज नर्सरी हे होते.
बांधकाम व्यावसायिक संस्थांचे सुमारे २८ स्टॉल्स प्रदर्शनात मांडण्यात आले होते. सहभागी झालेल्या स्टॉलधारकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. एक्स्पोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा नेते निवृत्ती अरिंगळे, माजी नगरसेवक दिनकर आढाव, संभाजी मोरूसकर, रमेश धोंगडे, व्यापारी बँक संचालक श्रीराम गायकवाड, मनोहर कोरडे, सुनील आडके, रविकिरण घोलप, राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम कोठुळे, दत्ता वाजे, भीमचंद चांद्रमोरे, अय्यास शेख, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे या मान्यवरांनी भेट दिली.
सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक यांनी तर, आभार प्रदर्शन नाशिक रोड ज्येष्ठ पत्रकार दिगंबर शहाणे यांनी केले. याप्रसंगी देशदूतचे जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, व्यवस्थापक मिलिंद वैद्य, कॉर्पोरेट व्यवस्थापक संदीप राऊत, दिगंबर शहाणे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर आनंद कदम, भगवंत जाधव, समीर पाराशरे, विशाल जमधडे, प्रशांत अहिरे यांनी परिश्रम घेतले.
नाशिककरांचे विश्वासू बांधकाम व्यावसायिक म्हणून नावलौकिक मिळालेले ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी आपले अत्यंत अत्याधुनिक सुविधा असलेले प्रशस्त प्रकल्प सादर केले आहेत. ग्राहकांना हे प्रकल्प नक्की आवडतील असा विश्वास संचालक ऋषभ जैन यांनी व्यक्त केला, तसेच ग्राहकांनी या प्रकल्पांना नक्की भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.



















