Sunday, May 19, 2024
Homeनाशिकगंगापूर धरणातून विसर्ग वाढवणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गंगापूर धरणातून विसर्ग वाढवणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत आहे.

- Advertisement -

पावसाचा जोर असल्याने गंगापूर धरणातून सध्या ५३७ क्यूसेसचा विसर्ग होत आहे. सकाळी १० वाजता विसर्ग वाढवून २००० क्यूसेसपर्यंत करण्यात येणार आहे.

तसेच पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्याटप्याने वाढवण्यात येईल, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या