Saturday, November 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहिलांचा आर्थिक विकास आणि आत्मसन्मान हाच आपल्या शहराच्या प्रगतीचा पाया - महापौर...

महिलांचा आर्थिक विकास आणि आत्मसन्मान हाच आपल्या शहराच्या प्रगतीचा पाया – महापौर आडके

महिलांच्या स्वावलंबनासाठी नवहितगुजचा ‘आत्मनिर्भर नारी’ उपक्रम

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

“महिलांचा आर्थिक विकास आणि आत्मसन्मान हाच आपल्या शहराच्या प्रगतीचा पाया आहे. महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल मी नवहितगुज महिला मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानते.” महिलांना केवळ मदत न करता त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने नवहितगुज महिला मंडळ, नाशिक यांच्या वतीने ‘नवहितगुज आत्मनिर्भर नारी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर- आडके उपक्रमाचे कौतुक करताना बोलत होत्या.

या उपक्रमांतर्गत विधवा, परित्यक्ता, निराधार तसेच गरजू महिलांना विविध व्यवसायांसाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये शिलाई मशीन, फॉल-पिको मशीन, ब्युटी पार्लर साहित्य आणि घरघंटी यांचा समावेश होता. साहित्याच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या व्यवसायाची संधी उपलब्ध करून देत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा विवेक वाणी यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, “महिलांना सक्षम करण्यासाठी केवळ आर्थिक मदत देणे हा आमचा उद्देश नाही, तर त्यांच्या हाताला कौशल्य आणि त्या कौशल्याला व्यवसायाची जोड देऊन त्यांना स्वावलंबी बनविणे हे आमचे ध्येय आहे. एखाद्या गरजू महिलेला व्यवसायाचे साधन मिळाले आणि त्यातून तिच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा मार्ग निर्माण झाला, तर त्यापेक्षा मोठे सामाजिक समाधान दुसरे नाही.”

त्या पुढे म्हणाल्या, “आज एका महिलेला दिलेले व्यावसायिक साहित्य हे केवळ एक साधन नसून तिच्या आत्मविश्वासाला दिलेली नवी दिशा आहे. भविष्यातही समाजातील गरजू महिलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कौशल्य व गरजेनुसार व्यवसायासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा प्रयत्न राहील. ‘मदतीचा हात’ देण्यापेक्षा ‘स्वावलंबनाची वाट’ दाखविणे, हीच नवहितगुजची सामाजिक बांधिलकी आहे.”

साहित्य वाटपानंतर लाभार्थी महिलांना स्वरोजगार, व्यवसाय नियोजन, ग्राहकांशी संवाद आणि आर्थिक स्वावलंबन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाला मोलाचे सहकार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा तसेच पत्रकार बांधवांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास नगरसेवक भूषण राणे, वाणी समाजाचे अध्यक्ष गिरीशजी मालपुरे यांच्यासह नवहितगुज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा वाणी, उपाध्यक्षा प्रणाली बागड, सचिव चारुलता शिरोडे, सहसचिव रुपाली येवले, खजिनदार लीना बागड, सहखजिनदार. सीमा सोनजे उपस्थित होत्या.

तसेच संचालिका ज्योत्स्ना मोराणकर, सरिता शिरोडे, पल्लवी वेढणे, प्रांजल कोठावदे, सारिका राणे, नयना अमृतकर, रुपाली वाणी, वैशाली कोठावदे, सुनीता वाणी, मोनाली अमृतकर, निमंत्रित संचालिका नीलिमा चिंचोरे, संगीता अमृतकर, दीपाली वाणी, श्वेता सोनजे यांच्यासह समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

याचबरोबर लाडशाखीय वाणी मित्र मंडळाचे विश्वस्त राजेश कोठावदे, प्रा. बी. एस. वाणी, विठ्ठल मोराणकर, विक्रम खैरनार, दिलीप कोठावदे, स्वप्निल येवले, प्रशांत शिरूडे, हितेश शहा, योगेश राणे, प्रसाद बागड, अनिल सोनजे, किशोर सोनजे, डॉ. प्रकाश भोकरे, डॉ. प्रियांका कोठावदे, निर्मला येवला , सुवर्णा मालपुरे, मनीषा शिनकर, सुभाष येवला, सुनील मुसळे, सुरेखा येवले, मनीषा शिरोडे, सुचित्रा वाणी, आशा मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘गरजू महिलेला मदत नव्हे, तररोड स्वावलंबनाची संधी’ या विचारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

ताज्या बातम्या

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा दोन दिवस पुणे दौऱ्यावर

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai केंद्रीय गृह मंत्री अमित शहा येत्या १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांच्या पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात दिवंगत उपमुख्यमंत्री...