Friday, November 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजपुरामुळे पुलाजवळील भराव खचला

पुरामुळे पुलाजवळील भराव खचला

डांगसौंदाणे-एकलव्यनगरचा संपर्क तुटला

- Advertisement -

डांगसौदाणे । वार्ताहर Dangsaundane

पश्चिम भागात होत असलेल्या संततधार पावसामुळे आरम नदीस मोठा पूर आला आहे या पुराच्या पाण्याबरोबर वाहून आलेली झाडे व लाकडे डांगसौंदाणे-एकलव्यनगरास जोडणार्‍या पुलात अडकून पुराच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने पुलाचा भराव खचून वाहून गेला आह. यामुळे या पुलावरील वाहतूक सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सध्या बंद करण्यात आली आहे.

बागलाण तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पश्चिम भागातील नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे आरम नदीला या वर्षातील सर्वात मोठा पूर आला. या पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेली मोठी झाडे आणि लाकडे डांगसौंदाणे-एकलव्य नगरला जोडणार्‍या पुलाला अडकली, ज्यामुळे पुलाजवळील पाण्याचा प्रवाह बदलला जावून परिणामी, पुलाचा भराव खचल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. हा पुल 15 वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला होता. यापूर्वी अनेक वेळा या पुलावरून पुराचे पाणी गेले आहे, परंतु या वर्षी आलेल्या पुरात मोठी झाडे पाण्यासोबत वाहून आल्याने आणि ती पुलाला अडकल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे

दिवसभर चालू असलेल्या पावसामुळे संध्याकाळपर्यंत पुलाचा भराव खचला आणि पुलाचे तळ मोकळे झाल्यामुळे हा पुल नदीपात्रात खचला आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर केल्याची माहिती दिली आहे. हा रस्ता पूर्णपणे बंद झाल्यामुळे वस्तीतील नागरिक आणि शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना डांगसौंदाणे येथे येण्यासाठी आता दोन किलोमीटरचा वळसा घालून यावे लागणार आहे.

दरम्यान बागलाण पश्चिम पट्ट्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे शेतीसिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात निकाली निघाला आहे या भीज पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे आरम नदीस पूर आल्याने नदी काठावरील गावांच्या पाणीपुरवठा योजनांना देखील संजीवनी मिळाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या