मुंबई | वृत्तसंस्था | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा १८ वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचा सलामीचा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स (Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders) संघांमध्ये खेळविण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही. परंतु, बोर्डाने अनौपचारिकरीत्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व १० संघांना महत्वाच्या सामन्यांच्या तारखा शेअर केल्याची माहिती मिळत आहे.
यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे कर्णधारपद रजत पाटीदारकडे (Rajat Patidar) सोपविण्यात आले आहे. तर गतवर्षी उपविजेता ठरलेला सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघाशी बंगळुरूचा सामना २३ मार्च रोजी राजीव गांधी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर २५ में रोजी होणार आहे. दरम्यान १२ जानेवारी २०२५ रोजी मुंबईत घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएल २०२५ चा हंगाम २३ मार्चपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले होते
आयपीएल स्पर्धेचा हंगाम प्रसारकांनी २३ मार्चपासून सुरू करण्याची विनंती केली होती. त्यामुळे आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकात (Schedule) पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे.स्पर्धेच्या अधिकृत वेळापत्रकावर येत्या १ ते २ दिवसांत अंतिम शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. तर आयपीएल २०२५ चे सर्व सामने मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, लखनौ, चेन्नई, बंगळूरु, पंजाब, हैदराबाद, दिल्ली, आणि जयपूर या नियमित १० स्टेडियम व्यतिरिक्त धर्मशाला आणि गुवाहाटी येथे खेळविण्यात येणार आहेत.
दरम्यान, गुवाहाटी येथे खेळविण्यात येणारे सायंकाळचे २ सामने राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, आणि चेन्नई सुपरकिंग्ज विरूध्द २६ आणि ३० मार्च रोजी खेळविले जातील. तसेच गतवर्षीप्रमाणे पंजाब किंग्ज आपले घरचे सामने धर्मशाला येथे खेळणार आहे. तर एलिमिनेटर आणि क्वालिफायर १ चा समान हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर आणि क्वालिफायर २ आणि अंतिम सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.
सलिल परांजपे, नाशिक