Monday, May 6, 2024
Homeधुळेजेबापूर-रोहन दरम्याची तळ फरशी उखडली

जेबापूर-रोहन दरम्याची तळ फरशी उखडली

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

पिंपळनेर-जेबापुर-रोहन रस्त्याची (Pimpalner-Jebapur-Rohan road) अत्यंत दुरावस्था (Very poor condition) झाली आहे. त्यात जामखेली नदीवरील जेबापूर ते रोहन दरम्यान असलेला फरशी पुरात उखडल्याने (floor was washed away by the flood) वाहतुक बंद (Traffic stop) झाली आहे. तरी फरची पुलाची तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांची केली आहे.

- Advertisement -

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जामखेली नदीला मोठा पूर आला आहे. जेबापुर ते रोहन गावाला जोडणारी तळ फरशी उखडून गेली आहे. त्यामुळे फरशीमध्ये मोठा खड्डा पडला असून हा रस्ता रहदारीसाठी बंद झाला आहे.

कारण गढूळ पाण्यात फरशीत पडलेला खड्डा दिसत नसून ट्रॅक्टर, मोटर सायकल तसेच इतर वाहने या खड्डयात जाऊन पडली होती. तरीही फरशी शासन अथवा आमदारांनी त्वरित दुरुस्त करून द्यावी. तसेच धनेर, धंदाई, दापुरा, दापूरी, जेबापूर, पिंपळनेर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे.

चार किलोमीटरपर्यंत खड्डयात रस्ते की रस्त्यात खड्डे हे समजेनासे झाले आहे. या गावांचा संपर्क पिंपळनेरशी असल्याने शेतकर्‍यांना खते, बी-बियाणे, आठवड्या बाजाराच्या लागणारे साहित्य तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळेत येण्या-जाण्याचा हा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे या रस्त्यावरील बस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचेही शालेय नुकसान होत आहे.

याच रस्त्याला कांदा मार्केट असल्यामुळे कांद्याच्या टॅक्टर ट्रॉल्या, पिकअप वाहनही याच रस्त्याने जा-ये करत असल्यामुळे पिंपळनेर-धनेर रस्त्याचे त्वरित मजबुतीकरणाचे काम करावे, अशी मागणी होत आहे. रस्त्यात ठिक-ठिकाणी नाले असल्यामुळे या नाल्यातून वाहनांना मोठी अडचण निर्माण होते. तरी या नाल्यांवर लहान पूल बांधण्यात यावे, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.

आ. सौ. मंजुळा गावित यांनी देखील या रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या निवेदनावर बी.एस.भदाणे, वामनराव भदाणे, शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, गोविंद पाटील, अरुण पाटील, यशवंत भदाणे, चंद्रजीत भदाणे, मनोज भदाणे, पोपट भदाणे, अरुण भदाणे, नामदेव पाटील, दौलत पाटील, वसंत पाटील, हेमराज भदाणे, गौरव भदाणे, भालचंद्र भदाणे, विजय अहिरराव, देविदास भदाणे, शरद भदाणे, गिरीश भदाणे, संजय भदाणे, तानाजी सोनवणे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या