Thursday, May 2, 2024
Homeजळगावपिंप्राळातील मंजूर अग्निशमन केंद्राचा निधी चोपड्याला वळविला

पिंप्राळातील मंजूर अग्निशमन केंद्राचा निधी चोपड्याला वळविला

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्हा नियोजन निधीतून (District Planning Fund) आपत्ती व्यवस्थापन योजनेंतर्गत (Disaster Management Plan) जळगाव शहरासाठी पिंप्राळा (Disaster Management Plan) येथील अग्निशमन केंद्राच्या (fire station) प्रस्तावित 1 कोटीचा निधी (funds) हा चोपडा नगरपालिकेला (chopada Municipality)अग्निशमन केंद्रासाठी वळविण्यात आला आहे. हा निधी वळविल्याने पिंप्राळा येथे आवश्यक असलेले अंतिम टप्प्यात असलेले हे अग्निशमन केंद्राला आता 1 वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा निधी राजकीय हेतू (political motives) पुरस्कृत वळविण्यात आल्याचे आरोप उपमहापौर कुलभूषण पाटील (Deputy Mayor Kulbhushan Patil) यांनी केले आहे.

- Advertisement -

जळगाव शहरात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जळगाव महापालिकेला अग्निशमन केंद्रासाठी एक कोटी रुपयांचा निधी 18 नोव्हेंबर 2022 ला मंजूर केला असल्याचे पत्र मनपाला जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडून आले होते. त्यानुसार अग्निशमन केंद्रासाठी प्रस्ताव पाठविण्याचे सूचना केलेल्या होत्या.

महापालिकेने पिंप्राळा येथील मनपाच्या जागेवर अग्निशमन केंद्र उभारणीचा एक कोटी 28 लाख रुपयांचा निधीचा ठराव महासभेत मंजूर केला होता. 28 लाख हे मनपा फंडातून वापरले जाणार होते. त्यानुसार मनपाने नगर विकास विभागाच्या सर्व तांत्रिक मान्यता यांची परवानगी घेऊन अग्निशमन केंद्राच्या विकास आराखड्याचे प्रस्ताव हा जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी 15 मार्च 2023 वेळेच्या आधी पाठवलेला होता.

जिल्हा प्रशासनाकडून या प्रस्तावाला मान्यता मिळालीच नाही. त्यात चोपडा नगरपालिकेला हा एक कोटीचा निधी हा हेतूपुरस्कृत वळविण्यात आले असल्याचाआरोप उपमहापौर भूषण पाटील यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या