Friday, May 3, 2024
HomeUncategorizedपुढील चार दिवस राहणार उष्णतेची लाट

पुढील चार दिवस राहणार उष्णतेची लाट

औरंगाबाद – aurangabad

उन्हाच्या (Temperature) तीव्रता वाढली असून तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. औरंगाबादसह मराठवाड्यात (Marathwada) उष्णतेची लाट सुरू असून पुढील तीन-चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने (Meteorological Department) दिला आहे.

- Advertisement -

दरम्यान, औरंगाबाद शहराचे तापमानही अंशाअंशाने वाढत असल्याचे चिकलठाणा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या आकड्यांवरून दिसून येते. वाल्मी येथील जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेच्या तापमान फलकावरही मंगळवारी दि.५ एप्रिलचे कमाल तापमान ४०.५ अंश सेल्सिअस दर्शविण्यात आले आहे. मंगळवारी (दि.५) रोजी शहराचे कमाल तापमान ४०.६ तर किमान २४.४ अंश सेल्सिअस होते. बुधवारी, ६ एप्रिल रोजी यात वाढ होऊन कमाल ४०.८ तर किमान २३.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेतील हवामान सहायक सुनील निकाळजे यांनी दिली.

उन्हाच्या चटक्यामुळे घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. सकाळी नऊ वाजेपासून उन्हाची तीव्रता जाणवत असून दुपारी घराबाहेरही होरपळ सुरू आहे. रात्री सूर्य मावळल्यानंतर प्रचंड उकाड्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. गेल्या आठवड्यातच तीव्र लाटेचा इशारा दिला होता. शहराचे तापमानाने चाळीशी पार केली आहे.

तापमान वाढणार

औरंगाबादसह मराठवाड्यात सध्या सर्वच ठिकाणी उष्णतेची लाट आहे. या सर्व भागात आकाश निरभ्र आहे. तापमानाचा पारा वाढत आहे. पाका महाराष्ट्राच्या दिशेने उष्णव कोरडे वारे वाहत ता या गाता दाती त तापमान वाढत चालले आहे. दोन-तीन दिवस कमाल तापमानात २ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या