Sunday, May 19, 2024
HomeनाशिकNashik Crime News : खून झालेल्या 'त्या' युवकाची ओळख पटली

Nashik Crime News : खून झालेल्या ‘त्या’ युवकाची ओळख पटली

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील एकलहरे रोड परिसरात (Eklahare Road Area) असलेल्या किर्लोस्कर कंपनी जवळील समोरच्या रस्त्यावर एका युवकाचा (Youth) धारदार हत्याराने खून (Murder) करण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र, त्या युवकाची पोलिसांना (Police) ओळख पटली नव्हती. यानंतर आता सदर युवकाची ओळख पटली असून चेतन ठमके असे त्याचे नाव असल्याचे नाशिकरोड पोलिसांनी सांगितले…

- Advertisement -

Nashik Crime News : एकलहरे परिसरात आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ही घटना समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत (Monica Raut) सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर सदर युवकाची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. यानंतर आता या युवकाची ओळख पटली आहे.

Lok Sabha Election 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील लढत जवळपास निश्चित!

दरम्यान, खून झालेल्या ठमकेचे वय साधारण ३० ते ३५ असून तो विजयनगर सिडको या भागातील रहिवासी आहे. त्याचप्रमाणे सदर युवकाला या भागात कोणी आणले होते का? किंवा तो स्वतःच आला होता? याबाबत पोलीस शोध घेत आहे. तसेच याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या