Friday, May 3, 2024
Homeनाशिक'सीईटीपी' एमआयडीसीने उभारण्याची आग्रही भूमिका

‘सीईटीपी’ एमआयडीसीने उभारण्याची आग्रही भूमिका

सातपूर ।प्रतिनिधी Satpur

उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सीईटीपी प्रकल्प हा एमआयडीसीनेच उभारावा या मागणीसाठी आयामा ने एमआयडीसी व एमपीसीबीला निवेदन दिले.

- Advertisement -

प्रलंबित असलेला क्वामन इन्फलुएन्स प्लॅन्ट (सीईटीपी प्रकल्प) हा एमआयडीसीनेच हा प्रकल्प पूर्ण करावा मागणी केली आहे. मुळातच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेच करावा अशी मागणी पूर्वीपासुन आयमा संघटनेनी केली होती.

परंतु एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा प्रकल्प क्षमता नसताना उद्योजकांवर लादला, हा प्रकल्प एमआयडीसीनेच करावा यासाठी आयमाने एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अन्बलगन, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुले यांना निवेदन दिले.

सातपूर व अऔद्योगिक वसाहतीत मुख्यतः इंजिनियरिंग, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, स्वीचगियरच्या कम्पन्या मोठ्या क्षेत्रातील प्रमाणात असून, मोठ्या कपन्यांच्या सरफेस कोटींग हा मुळातच अविभाज्य घटक आहे, त्यामुळे केमिकल, प्लेटींग, कोटींग करणार्‍या छोट्या मोठ्या प्रमाणात आहेत तसेच उच्च न्यायालयाने १८ डिसेम्बर २०१८ च्या निर्णय १ ऑफ ५३.२ पीआयएल १७६. २ मधील पॅरा क्र ३१ नुसार असे आदेश दिले आहेत की जर युजर इंडस्ट्रीज (हे लघुउद्योजक ) हा सीईटीपी प्रकल्प उभारण्यास असमर्थ असतील तर एमआयडीसीनेच स्वतः हा प्रकल्प उभा करावा व कार्यान्वित करावा.

तसेच या प्रकल्पासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून पुढील कार्यवाही करावी असे निर्देश देखील उच्चान्यायालयाने दिले आहेत. सीईटीपी प्रकल्प एमआयडीसीनेच पुर्ण करावा तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना होऊ नये अशी अपेक्षा आयामातर्फे करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या