Tuesday, May 13, 2025
Homeनाशिकप्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे नाव आर्य ठोके

प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे नाव आर्य ठोके

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

संकटे माणसाला खचवतात, पण काही व्यक्ती त्यांच्यावर मात करून आश्चर्यचकित करणारी यशोगाथा लिहितात. पहिलीपासूनच ‘मोटर न्यूरॉन डिसीज’ या दुर्मीळ आजाराने ग्रासल्याने ज्याला शाळेत जाणे शक्य झाले नाही, अशाच एका विद्याथ्याने स्वतः अभ्यास करुन दहावीत 96 टक्के गुण मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे.

आर्य योगेश ठोके असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. आर्यला स्पाइनल मस्कुलर ट्रॉफी या दुर्धर आजाराने ग्रासले होते. पहिलीपासूनच त्याला या आजाराची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे रवींद्रनाथ विद्यालयात जाणेही त्याला शक्य झाले नाही, घरीच आई, वडील अभ्यास घेेऊ लागले. शिक्षक मदत करु लागले. एवढा आजारी असूनही आर्यची बौध्दिक क्षमता मात्र तुसरभरही कमी झाली नाही. तो दरवर्षी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ लागला. दहावीनंतर त्याने घरी बसूनच अभ्यास केला. विज्ञान, गणित, संंस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळवले. मंगळवारी दहावीचा निकाल हाती आल्यानंतर त्याला 96 टक्के गुण मिळालेले पाहताच आई सुप्रिया, वडील योगेश ठोके यांंचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. आनंदाश्रुंनी मातेचे मन भारावून गेले होते.

याबाबत योगेश ठोके म्हणाले की, आर्य आजारी असला तरी त्यांची बौध्दिक क्षमता कमालीची तीक्ष्ण आहे. स्वतः अभ्यास करुन त्याने हे देदीप्यमान यश संपादन केले आहे. त्याला भविष्यात भौतिकशास्रात संंशोधन करण्याची इच्छा आहे. त्यात तो निश्चित यश मिळवेल, अशी खात्री आहे.

मोटर न्यूरॉन डिसीज आजाराविषयी…
व्हीलचेअरशिवाय एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही, अशा परिस्थितीत पृथ्वीच्या उत्पत्ती सिद्धांत मांडणारे फिजिसिस्ट प्रोफेसर स्टीफन हॉकिंग यांना हाच मोटर न्यूरॉन डिसीज होता. या आजारात मेंदूपासून संपूर्ण शरीरात स्नायूंना सिग्नल प्रसारित करण्यासाठी पेशींचा र्‍हास होतो. स्नायू कमकुवत होतात आणि त्यावर ताण येतो, बोलताना आणि गिळताना त्रास होतो आणि अर्धांगवायू यांसारखी लक्षणे दिसून येतात. याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटक या स्थितीस कारणीभूत ठरतात. बहुतेक लोकांना चाळीशीनंतर लक्षणे दिसू लागतात आणि 50 ते 70 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज सर्वात सामान्यपणे आढळून येतो.आता मोटर न्यूरॉन डिसीजवर उपचार करण्यासाठी अभिनव पध्दती विकसित झाल्या आहेत. आर्यसाठी तो आशेचा किरण ठरो, हीच सदिच्छा.

जिद्द अन् मेहनतीचा विजय
या आजारामुळे त्याला शाळेत प्रत्यक्ष जाणे शक्य झाले नाही. पण त्याने शिक्षणासाठीची आस कधीच सोडली नाही. ज्या वयात बहुतांश विद्यार्थी शिकण्यासाठी शाळेवर अवलंबून असतात, त्या वयात आर्याने घरातूनच आत्मविश्वासाने आणि सातत्याने अभ्यास करून हे यश संपादन केले. या यशामागे आर्यची मेहनत तर आहेच, पण त्याहूनही अधिक मोलाची भूमिका आहे त्याच्या आई सुप्रिया यांची आणि आजीची. त्यांनी दिवसरात्र झटत, मुलाच्या प्रत्येक गरजेची काळजी घेत, त्याला शिक्षणात मागे पडू दिले नाही. आर्यच्या आजीनेही आपल्या नातवासाठी प्रेमाने, संयमाने आणि मायेने त्याला आधार दिला. आर्यच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबाला अभिमान वाटतो आहे. त्याच्या जिद्दीपुढे आजारही हरला. हे यश केवळ गुणांचे नाही, तर माणसाच्या आत्मबलाचे, चिकाटीचे आणि कुटुंबाच्या समर्पणाचे प्रतीक आहे.
-योगेश ठोके, आर्यचे वडील

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

जागतिक मागणीनुसार रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास विभागाचे नवे ‘पीपीपी’...

0
मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये रूपांतरित करून उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार आणि...